मुक्तपीठ टीम
महिनाभरानंतरही रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि वारंवार दिल्लीच्या वाऱ्या यामुळे टीका होत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आता अडचण वाढली आहे. रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत निती आयोगाच्या बैठकीनंतर देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र काढण्यात आलं. या छायाचित्रात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच नाही तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पहिल्या रांगेत आहेत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत दिसत आहेत. त्यावरुन महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.
PM @narendramodi, Union Ministers, Chief Ministers and other respected dignitaries are attending the 7th Governing Council meeting of @NITIAayog. pic.twitter.com/zFODzpnp4d
— PMO India (@PMOIndia) August 7, 2022
दिल्ली दरबारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत- अमोल मिटकरी
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे.
- या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा” हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत?
- प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो .शिंदे साहेब वाईट वाटले, असे म्हटले आहे.
“दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा” हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो .शिंदे साहेब वाईट वाटले.@mieknathshinde pic.twitter.com/xRRArrRgQd
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 7, 2022
शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांकडून टीका
शिवसेनेच्या मुंबईतील माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे. निती आयोगाच्या बैठकीनंतर छायाचित्र टिपताना मुख्यमंत्री शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभे करण्यात आले. याचा अर्थ काय समजायचा, आता दोस्त दोस्त ना रहा…?
रोहित पवारांची प्रतिक्रिया!!
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यासंदर्भात टिप्पणी केली आहे.
- एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
- तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही.
- प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय.
- यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
जयंत पाटलांची एकनाथ शिंदेंवर टीका!!
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांच्या स्थानावरून टीका केली आहे.
- ‘औरंगजेबासमोर छत्रपती शिवरायांना दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली.
- आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभं राहावं लागत आहे.
- परिस्थिती किती बदलली आहे, हे पाहायला मिळत आहे.
शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
राजकारणासाठी राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्या ट्वीटवर दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर दिल्लीत सन्मान वाढला आहे. राष्ट्रपती शपथग्रहण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पहिल्या रांगेत उभे होते ते कोणाला दिसले नाही, हे दुर्देव असे प्रत्युत्तर आमदार उदय सामंत दिले आहे.