मुक्तपीठ टीम
नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीसह प्रथम श्रेणीसह नेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यूजीसी, नवी दिल्लीद्वारे अकॅडमिक कंसल्टेंट या पदावर भरती निघाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
यूजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या नोकरीसाठी प्रोबेशन कालावधी किमान सहा महिने आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल. या पदासाठी उमेदवारांची निवड निवड समितीच्या शिफारशीनुसार केली जाईल.
अधिक माहितीसाठी
यूजीसीच्या अधिकृत वेबसाइट www.ugc.ac.in/jobs वरून माहिती मिळवू शकता.