मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर या पदासाठी १७ जागा, सिस्टिम ऑफिसर या पदासाठी २३ जागा अशा एकूण ४० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) बी.इ./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए २) नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसइ/ आरएचसीइ/ आरएचइएल ३) ५ वर्षे अनुभव.
२) पद क्र.२- १) बी.इ./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए २) नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसइ/ आरएचसीइ/ आरएचइएल ३) १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bombayhighcourt.nic.in/index.php वरून माहिती मिळवू शकता.