मुक्तपीठ टीम
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआय) ने ४८२ अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावेत. अर्जदारांच्या पदांवर अर्ज सुरू झाले आहेत, अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
या करिअर संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठ च्या www.muktpeeth.com वरील नोकरी – धंदा – शिक्षण कॅटेगरी तपासा.
कॅाटन कॅार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी पुढील पदे आहेत:
- मॅकॅनिक (अर्थमुव्हिंग मशिनरी) ४२
- वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) ४२
- वायरमन ४२
- स्विच बोर्ड अटेंडंट ४२
- वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) ४२
- वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) ४२
- वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी) ४२
- मल्टीमीडिया आणि वेबपेज डिझाइनर १०
- आयटी आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाल्या देखभाल १०
- शॉट फायर / ब्लास्टर माईन ४२
- मॅकॅनिक मोटर वाहन ४२
एकूण ४८२ पदे
या पदांच्या उमेदवाराचे वय १८ ते २१ वर्षे असावे.
उमेदवार पीसीएम ग्रुप (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) चे असतील तर चांगले आहे.
निवड झाल्यावर उमेदवारांना महिन्याला ६,००० रुपये पगार मिळेल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
पाहा व्हिडीओ: