Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

January 23, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
mahadbt

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालू असल्यामुळे सन २०२१-२२ करीता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची ३१ जानेवारी २०२२ अंतिम मुदत असून पात्र विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले आहे.

 

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग -2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य अशा राज्य शासन पुरस्कृत १४ शिष्यवृत्ती योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते.

 

आर्थिक वर्ष माहे मार्च २०२२ अखेर असल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रत्येक पात्र विद्यार्थीला शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संचालनालयाच्या schol.dhepune@gov.in या ई-मेल पत्त्यावर तसेच ०२०-२९७०७०९८/२६१२६९३९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

 

अर्ज करताना तांत्रिक अडचणीचे निराकारण करण्यासाठी विभागीय सहसंचालक कार्यालयनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईसाठी अधिक्षक अनिल रणधीर (९३७०१४६१५२/०२२-२२६५६६००/२२६९१५२८), पुण्यासाठी मुख्य लिपीक अरविंद भागवत (९४०४८७९७८८/०२०-२६१२७८३३/२६०५१६३२), पनवेलसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी युवराज साळुंके (९००४७१२००७/०२२-२७४६१४२०/२७४५३८२०), कोल्हापूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी धैर्यशिल कारिदकर (७५०६३२३१२०/०२३१-२५३५४००/५३५४५४), सोलापूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास कदम (९८२२९०४८६७/०२१७-२३५००५५), जळगांवसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी राम राठोड (९४२२८६२८७३/०२५७-२२३८५१०), औरंगाबादेसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष थेरोकार (९४०४४८१७१८/०२४०-२३३१९१३/२३२२९१५), नांदेडसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश पाटील (८२७५५९०९४४/०२४६२-२८३१४४), अमरावतीसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. प्रभु दवणे (९४२२८०९४१८/०७२१-२५३१२३५) आणि नागपूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशोक बागल (७७५६८२२९१०/०७१२-२५५४२१०) या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा.

शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ५६ कोटी रुपये वर्ग

महाडीबीटी पोर्टलच्या डॅशबोर्ड अहवालानुसार २०२०-२१ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर २ लाख १२ हजार १५३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून शिष्यवृत्ती योजनेसाठी १ लाख ७३ हजार ६२५ विद्यार्थी पात्र झालेले आहेत. आतापर्यंत १ लाख २९ हजार २७० विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी झालेल्या बँक खात्यावर ५६ कोटी ३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

 

सन २०२१-२२ मध्ये यावर्षी ३९ हजार १०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्याशिवाय शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी आणि पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहनदेखील श्री.माने यांनी केले आहे.


Tags: Director of Education Dr. Dhanraj ManeDirectorate of Higher Educationgood newsMahaDBT PortalmuktpeethOnline ApplicationScholarship Schemeउच्च शिक्षण संचालनालयऑनलाईन अर्जचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणमहाडीबीटी पोर्टलमुक्तपीठशिक्षण संचालक डॉ. धनराज मानेशिष्यवृत्ती योजना
Previous Post

जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना, पाणीपट्टीच्या मुळ मुद्दलावरील विलंब शुल्क माफ

Next Post

‘एल अँड टी’ने वेळेच्या आधीच अमेरिकेत पुरवल्या परिवर्तनीय डिझेल प्रकल्पाच्या भट्ट्या

Next Post
l and t

‘एल अँड टी’ने वेळेच्या आधीच अमेरिकेत पुरवल्या परिवर्तनीय डिझेल प्रकल्पाच्या भट्ट्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!