Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगली वस्तुसंग्रहालय साजरा करणार १८ मे रोजी जागतिक संग्रहालय दिन

May 15, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Sangli Museum

मुक्तपीठ टीम

जगभरात १८ मे रोजी जागतिक संग्रहालय दिन साजरा केला जातो. हा दिन सांगली वस्तुसंग्रहालयातही साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त संग्रहालय प्रेक्षकांना मोफत पहावयास उपलब्ध असणार आहे. तसेच संग्रहालयात कला-प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सांगली वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक शं. धों. मुळे यांनी दिली आहे. या निमित्तानं पुरातत्व ऐतिहासिक वस्तू प्रेमींसाठी सांगली वस्तुसंग्रहालयाची संपूर्ण माहिती देण्याचा हा प्रयत्न…

सांगली वस्तुसंग्रहालयची महत्वाची माहिती

सांगली सारख्या सांस्कृतिकदृष्टया महत्वाच्या शहरामध्ये त्या दर्जाला शोभेल असे उत्कृष्ट चित्रांचा संग्रह असलेले एक छोटेखानी संग्रहालय आहे. सांगली संस्थानचे दिवंगत राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी रसिक आणि संग्रहाक वृत्तीने ज्या कलात्मक वस्तूंचा संग्रह केला त्याचा जनतेला आस्वाद घेता यावा या उददेशाने त्याचे रुपांतर राजवाडयाच्या इमारतीतील एका छोटेखानी संग्रहालयात करण्यात आले आहे.

या संग्रहालयाचे उदघाटन दि. ९ जानेवारी १९५४ साली भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे हस्ते करण्यात आले. संस्थाने विलीन होण्याच्या काळात हे संग्रहालय अन्यत्र एकादया शहरात हलविण्याचे घाटत होते. परंतु राजेसाहेबांच्या आग्रहाखातर सांगलीतील नागरीकांसाठी ते याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले आहे. सांगली संग्रहालय आकारमानाने जरी लहान असले तरी त्यातील कलाकृती या नामांकित संग्रहालयाच्या तोडीच्या निश्चितच आहेत. सध्या अनेक प्रगत राष्ट्रामध्ये अशा त-हेची संग्रहालये ही देशाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जतन करणारी व वृध्दिंगत करणारी संस्था म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

सांगली संग्रहालयाचे वैशिष्टय हे की, परदेशी कलाकार जेम्स वेल्स यांची तैलरंगातील उत्कृष्ट चित्रे या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. जेम्स वेल्स या चित्रकाराने इ.स.१७९२ साली प्रेसिडेंट चार्ल्स मॅलेट यांच्या शिपारसीने भारतातील अनेक संस्थानिकांची चित्रे त्यांच्याकडे जावून चितारली होती. त्यातील सवाई माधवराव पेशवे व नाना फडणवीस या इतिहासप्रसिध्द व्यक्तिीची त्याने चितारलेली मूळ चित्रे या संग्रहालयात पहावयास मिळतात. तर भारतीय चित्रकारापैकी रा. धुरंधर, व्ही.व्ही.साठे, गांगुली यांची चित्रे देखील या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. ए.एच.मुल्लर यांची रामायणातील प्रसंगावर आधारीत १५ तैलरंगचित्रे हा या संग्रहालयाचा अनमोल ठेवा आहे. ए.एच. मुल्लर यांच्या एका चित्रास १९११ साली बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले होते ते चित्र राजकन्या ब्राम्हणाच्या मुलास दान देताना या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेले आहे.

मुंबईचे प्रसिध्द शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांचे शबरीच्या वेषातील पार्वती हे एक वैशिष्टपूर्ण शिल्प या संग्रहालयात प्रदर्शित केलेले आहे. या शिल्पाकृतीस दिल्ली येथील प्रदर्शनात १९०२ साली लॉर्ड कर्झन यांचे हस्ते सुवर्णपदक प्राप्त झालेले होते. महाराष्ट्रात जी काही उत्कृष्ट शिल्पे आहेत त्यात या शिल्पाकृतीचा समावेश करावा लागेल. पुढे काही वर्षानंतर बळवंत गोविंद पोतदार यांनी पुन्हा हाच विषय घेवून शबरी लाकडामध्ये घडविली तीही या संग्रहालयात पहावयास मिळते.

संग्रहालयाकडे असणाऱ्या वैशिष्टयपूर्ण वस्तुमध्ये इटली येथील पिसाच्या झुकत्या मनोऱ्याची मार्बल मधील प्रतिकृती, तसेच फत्तेपूरशिक्री या ठिकाणी असणा-या सलीम चिस्ती यांच्या कबरीची मार्बल मधील प्रतिकृती, या प्रतिकृती असून देखील संबधित वास्तूच्या वेशिष्टयासह परीपूर्णतेने साकारण्यात आलेल्या आहेत. जपानमधील गौतमबुध्दाचे सुवर्णमंदिर तसेच सांगलीच्या आयर्विन पुलाची लाकडी प्रतिकृती येथे पहावयास मिळते.

या संग्रहालयाकडे असणा-या महत्वाच्या वस्तूमध्ये ऐतिहासिकदृष्टया महत्वाची वस्तू म्हणजे विजयनगरच्या कृष्णदेवरायाच्या ताम्रपट, हा ताम्रपट संस्थान काळात शिरहट्टी तालुक्यातील तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेल्या बिदरहळळी या गावी एका शेतक-यास शेत नांगरताना सापडला. तेथून आणून तो येथे संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे.

तंजावर शैलीतील मेणात बनविलेले एक चित्रही या संग्रहालयात आहे. बाळकृष्ण असा त्याचा विषय , आज तिनशे वर्षे झाली पण काळाची पावले या चित्राकडे वळू शकलेली नाहीत. जी.पी.गांगोली असेच आणखी एक जातीचे कलाकार, त्यांचे धुक्यातील आगगाडी हे चित्र पाहताना कलाकराचे संवेदनशील मन जागृत होते. ए.एच.मुल्लर यांच्या गंगावतरण या चित्रात गंगा आणि तिला आपल्या जटेत घेणारा शंकर त्या देखाव्यात संकेतापुरतेच दाखविले आहे. यामुळे चित्रांचा विषय आणि त्यामागचा विचार मात्र खोल परिणाम साधून चित्र कायमचे लक्षात राहते.

चित्राप्रमाणे शिल्पवैभवही अप्रतिम आहे. यामध्ये संग्रहालयाच्या दारातच रोमन संस्कृतीतील मक्युरीचा पुतळा, इजिप्शियन पृथ्वीदेवता इसिस, न्यायदेवता ओसोरीज,गायक मुसे, तत्ववेता सॉक्रेटिस, रशियन राजा पिटर द ग्रेट, शूर अलेक्झांडर, रोमनांचा राजा टोजन, जुलमी बादशहा निरो, ज्युलियस सिझर, इजिप्तची राणी क्लिओपात्रा, रोमन युध्ददेव-देवता अशी अनेक महान व्यक्तिमत्वे या प्लास्टरच्या माध्यमातून आपली ओळख दाखवितात.

तसेच तांब्या पितळेची कलात्मक भांडी, हस्तीदंती चटई, उठावाची काष्ठशिल्पे , चंदनाच्या पेटया, लाकडी चौ-या, चंदनी पंखे, वेगवेगळया आकाराच्या व वैशिष्टयपूर्ण चिनीमातीच्या फुलदाण्या, पितळी बैलगाडया, प्रतापगडावर सापडलेल्या कलात्मक दिव्याच्या माळा, चिंचोक्यावर कोरलेला वाघ व हत्ती, तसेच चिचोक्याच्या आकाराएवढया चंदनी लाकडामध्ये कोरलेला नंदीव गणपती या छोटया कलाकृती देखील वैशिष्टयपूर्ण आहेत.

संग्रहालय एस.टी. स्टॅन्डपासून २ कि.मी. व रेल्वे स्टेशनपासून 6 कि.मी. अंतरावर आहे. संग्रहालयाचा दुरध्वनी व फॅक्स क्रमांक (०२३३) २३७६९१३ हा असून ई-मेल आय. डी. sangali233museum@gmail.com हा आहे. संग्रहालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यत असून, प्रवेश शुल्क रु. १०/- प्रौढासाठी व लहान १५ वर्षाच्या आत रु. १/- तसेच महाविघालयीन विघार्थ्यास रु. ५/- तसेच विदेशी पर्यटक यांना रु. १००/- इतके आहे. संग्रहालय दर सोमवारी बंद असते.


Tags: good newsmuktpeethSangli MuseumWorld Museum Dayचांगली बातमीजागतिक संग्रहालय दिनमुक्तपीठसांगली वस्तुसंग्रहालय
Previous Post

आता कॅब कंपन्यांनी सुधारणा केली नाही तर, सरकार कडक कारवाई करणार

Next Post

हायब्रीड वाहनांवरील कर कमी केल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढण्याची शक्यता

Next Post
electric vehicle

हायब्रीड वाहनांवरील कर कमी केल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!