मुक्तपीठ टीम
गेली ४१ वर्षे म्हणजे एकेकाळी हॉकीचा विश्वसम्राट असणाऱ्या भारतासाठीचा पदकांच्या दुष्काळाचा काळ. त्यात या ऑलिम्पिकमध्येही उपांत्य फेरीत भारतीय संघाचा निराशाजनक पराभव झाला. आता मात्र, तो पराभव मागे टाकत विजय मिळववण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे.
भारताने कांस्यपदकाच्या लढतीत हॉकीतील दादा असणाऱ्या जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. त्यानंतर भारताला कधीही पदक मिळवता आले नाही. यावेली संघ गेला होता तो इतिहास घडवण्याच्या जिद्दीनेच. परंतु उपात्य फेरीत बेल्जियमविरुद्ध काही चुका नडल्या. पराभवाचा धक्का बसला.
Let me smile now 🙏 pic.twitter.com/8tYTZEyakU
— sreejesh p r (@16Sreejesh) August 5, 2021
त्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न साकारले. अगदी शेवटच्या सहा सेकंदातही जर्मनीने भारतासोबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशने एखाद्या भिंतीसारखे काम केले. तो आडवा जात राहिला. अगदी शेवटच्या क्षणी जर्मनीला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवरील गोलचा प्रयत्न त्यानेच हाणून पाडला. भारताचा विजय झाला.
Why so cool king ❤️ pic.twitter.com/WJP6gt8e2i
— Prayag (@theprayagtiwari) August 5, 2021
भारताविरोधात चार गोल झाल्यानं धडधड वाढली…
- शेवटच्या सामन्यामध्ये भारताविरोधात ४ चार गोल झाले.
- मात्र, निर्णायक प्रसंगी श्रीजेशने मजबूत बचाव करत गोल अडवले आणि भारताची एका गोलची आघाडी टिकवली. त्यामुळेच भारत जिंकला.
- तिसरा क्वार्टर संपला तेव्हा भारताची ५-३ आघाडी कायम होती.
- चौथ्या क्वार्टरमध्ये लुकॅस विंडफेडरने जर्मनीला लाइफलाइन दिली.
- पेनल्टी कॉर्नरमधून गोल करत जर्मनीचे आव्हान कायम राखले.
- जर्मनीने भारतीय गोलपोस्टवर डागलेला गोल पीआर श्रीजेश पायाच्या मधून गेला.
- हा गोल श्रीजेशला रोखता आला नाही. या गोलमुळे जर्मनी आणि भारतामधील गोलचा फरक अवघ्या एकवर आला.
श्रीजेशनेच रोखला पराभव…मिळवला विजय!
- त्यानंतर श्रीजेशने संधीच मिळू दिली नाही.
- जर्मनीला पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामना बरोबरीत सोडवण्याची रणनीती होती.
- सामन्यातील शेवटच्या सहा सेकंदात जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला.
- ही जर्मनीची शेवटची संधी होती.
- शिट्टी वाजताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला.
- मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय हॉकी टीमनं ऑलिंपिकमध्ये तिरंगा फडकावला!