मुक्तपीठ टीम
ओला ही अपबेस कॅब सर्व्हिस कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे. ओला जुलै मध्ये भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. ओलाची हाय रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय ग्राहकांसाठीही उपलब्ध असेल. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी हायपर चार्जर नेटवर्क देखील तयार करण्यात येत आहे. ओलाच्या या चार्जिंग नेटवर्कमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंट्स असणार आहेत. हे नेटवर्क ४०० शहरांमध्ये पसरलेले असेल.
गेल्या वर्षी ओलाने चोवीशे कोटींच्या गुंतवणूकीसह तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला कारखाना सुरू करणार असल्याचे जाहीर केले. या कारखान्याच्या निर्मितीमुळे जवळजवळ १० हजार रोजगार निर्माण होतील. ही जगातील सर्वात मोठी स्कूटर उत्पादन फॅक्टरी असेल, जेथे दरवर्षी २० लाख स्कूटर तयार केल्या जातील. ओलाचे अध्यक्ष आणि ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) भविश अग्रवाल यांनी सांगितले की, “आम्ही जूनपासून हा कारखाना सुरू करणार आहोत, ज्यामध्ये २० लाख स्कूटर तयार होतील. एकदा कारखाना सुरू झाला की स्कूटरची विक्री सुरू होईल. जुलैपासून ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू होणार आहे.”
ही इलेक्ट्रिक स्कूटर उत्तम फीचर्ससह सुसज्ज असेल, ज्याची किंमत कंपनीने अजून जाहीर केलेली नाही. अग्रवाल म्हणाले की, “इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यासाठी मजबूत चार्जिंग नेटवर्क आवश्यक आहे. आमचे हायपरचार्जर नेटवर्क सर्वात मोठे चार्जिंग नेटवर्क असेल ज्यामध्ये दुचाकी देखील चार्ज केली जाऊ शकते. हे चार्जिंग नेटवर्क देशभरातील ४०० शहरांमध्ये पसरले जाईल. या चार्जिंग नेटवर्कमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंट्स असतील.
पहिल्या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात ५ हजार चार्जिंग पॉईंट्ससह देशभरातील १०० शहरे समाविष्ट आहेत. रिचार्जिंग नेटवर्क इतके शक्तिशाली होईल की ओला इलेक्ट्रिक स्कूटरला केवळ १८ मिनिटात ५० टक्के चार्ज करता येईल. तेवढ्या चार्जिंगच्या बळावर ही स्कूटर ७५ किमी धावू शकेल. ही केवळ अतिशय वेगवान नाही तर कमी खर्चातील परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर असेल.
पाहा व्हिडीओ: