मुक्तपीठ टीम
अवघ्या २४ तासात एक लाख भारतीय ग्राहकांनी बूक केलेली ओला ई-स्कुटर लाँचिंगच्या आधीच प्रचंड चर्चेत आहे. या ई-स्कुटरचं नवं फिचर आता उघड झालंय. हे फिचर आहे जे बहुधा कोणत्याही टू व्हिलरमध्ये नसलेलं. ते आहे ओला ई-स्कूटर मागे घ्यायची असेल तर उगाच जोर लावावा लागणार नाही, त्यासाठी कारप्रमाणेच रिव्हर्स गिअर आहे.
अॅपबेस कॅब सेवा पुरवणारी ‘ओला’ भारतातील आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कुटरचे जबरदस्त लाँचिंग करण्याच्या तयारीत आहे. इंधन दरवाढीची नेहमीच्या टांगत्या तलवारीपासून स्वातंत्र्य मिळवून देणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वातंत्र्यदिनी लॉन्च होईल. याआधी कंपनी ओलाच्या खास स्कूटरची वैशिष्ट्ये सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता, ओला स्कूटरचं एक महत्वाचं फीचर्स लोकांसमोर आणण्यात आले आहेत. यामध्ये कारसारखे रिव्हर्स गिअर आहेत. त्यामुळे ओलाची स्कुटर रिव्हर्स गिअरमध्येही चालवता येईल.
ओलाची ई-स्कूटर…दणदणीत, खणखणीत!
- ओला ई-स्कूटर एका चार्जमध्ये १५० किमी पर्यंत धावते.
- स्कुटरचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे.
- स्कुटर फक्त १८ मिनिटांत ५० टक्के चार्ज होते.
- या इलेक्ट्रिक स्कूटरला स्मार्टफोनही जोडता येते.
- ई-स्कुटर चार्ज करणे ही समस्या मानली जाते, पण ओलाने त्यावरही मार्ग काढलाय.
- ओलातर्फे भारतातील ४०० शहरांमध्ये १ लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट बसवले जातील.