मुक्तपीठ टीम
भारतातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपरपैकी एक असणाऱ्या ओबेरॉय रियल्टी लिमिटेडने एक नवा टॉवर लाँच केला आहे. ओबेरॉय रियल्टी ही त्यांच्या आलिशान निवासी विकासासाठी ओळखली आणि नावाजली जाते. त्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईच्या गोरेगावमधील ओबेरॉय गार्डन सिटीतील एलिशियन प्रकल्पात एक नवीन टॉवर लाँच केला आहे. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात आतापर्यंत ३ लाख ९० हजार चौरस फूटांसाठी ७८७ कोटींचे बुकिंग झाले आहे. यापूर्वी ओबेरॉय गार्डन सिटीमध्ये १ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत २,७०५ कोटी रुपये मुल्याचे बुकिंग झाले आहे
कसा आहे नवा आलिशान टॉवर?
- ओबेरॉय गार्डन सिटी हा ओबेरॉय रियल्टीचा प्रमुख प्रकल्प आहे जे गोरेगावमधील सर्वाधिक मागणी असलेले रिअल इस्टेटचे स्थान ठरले आहे.
- हा प्रकल्प ८० एकरांमध्ये पसरलेला आहे.
- बीकेसी, उपनगरीय स्टेशन आणि आगामी मेट्रोसाठी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसह आहे.
- नवीन टॉवरमध्ये ऐसपैस असणारे ३ किंवा ४ बीएचके अपार्टमेंट्स एकत्र उपलब्ध आहेत.
- ४ बीएचके अपार्टमेंट्स आरे ग्रीन्सच्या निसर्गरम्य दर्शनासह वसले आहेत. ओबेरॉय गार्डन सिटी येथील एलिशियन प्रकल्प एक अत्याधुनिक जीवनशैली आणि ३५ हून अधिक सुविधा देतो.
- या सुविधांमध्ये स्क्वॅश कोर्ट, गोल्फ सिम्युलेटर, फुटसल कोर्ट, मिनी थिएटर आणि बऱ्याच काही गोष्टींचा समावेश आहे.
- हा प्रकल्प सामाजिक आणि जीवनशैली पायाभूत सुविधा प्रदान करतो.
प्रकल्पाला जबरदस्त प्रतिसाद
- ओबेरॉय रियल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय, म्हणाले की, “आमच्या ग्राहकांकडून असा जबरदस्त प्रतिसाद मिळणे हा आमच्यासाठी एक विलक्षण क्षण आहे. ग्राहकांनी वेळोवेळी आमच्यावर विश्वास दाखवला आहे.
- चांगल्या प्रकारे जोडलेल्या उपनगरात तयार इकोसिस्टममध्ये ऐसपैस जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी एलिशियन हा एक उत्तम पर्याय आहे.
- प्रकल्पावर दिसणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे आम्ही आनंदी आणि प्रेरित झालो आहोत. असे विकास ओबेरॉय म्हणाले.
ओबेरॉय रियल्टी लिमिटेड बद्दल
- ओबेरॉय रियल्टी लिमिटेड ही भारतातील आघाडीची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे.
- या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.
- निवासी, कार्यालयीन जागा, रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि इंफ्रास्ट्रक्टर वर्टिकलमधील प्रीमियम विकासावर या कंपनीचा भर आहे.
- रिअल इस्टेट क्षेत्रात, ओबेरॉय रियल्टी हा एक निर्दोष ट्रॅक रेकॉर्ड असलेला प्रस्थापित ब्रँड आहे.
- त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट त्याच्या ग्राहकांसाठी विशिष्ट डिझाईन्स, आणि दर्जेदार फिनिशसह उत्तम विकास करणे आहे.
- जे त्यांच्या को-यूज आणि सिंगल-सेगमेंट विकासाद्वारे ऐतिहासिक प्रकल्पांमध्ये दिसून येते.
- नाविन्यपूर्ण डिझाइन, नियोजन उपक्रम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या या मिश्रणामुळे कंपनीला भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये ४२ पूर्ण झालेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरवता आले आहेत.
- कंपनीबद्दल अधिक माहितीसाठी https://www.oberoirealty.com ही अधिकृत वेबसाइट पाहू शकता.