मुक्तपीठ टीम
आरोग्य सेवेचा कणा असलेल्या परिचारिकांच्या हक्कासाठी सोमवारपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले. राज्यातील सात हजार परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या. दरम्यान फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर २५ जूनपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे.
पारिचारिकांच्या मागण्या
• कायमस्वरूपी पदभरती करा
• सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे जोखीम भत्ता (नर्सिंग अलाउन्स) देण्यात यावा.
• कोरोनाकाळात सात दिवस कर्तव्यकाळ व तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवून बंद केलेली साप्ताहिक सुटी देण्यात यावी.
• कोरोना काळामध्ये परिचारिकांच्या रजा स्थगित केल्यामुळे अर्जित रजा तीनशेपेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत असल्याने त्या पुन्हा उपभोगण्याची परवानगी द्यावी.
• केंद्र सरकारप्रमाणे परिचारिकांच्या पदनामात बदल करण्यात यावा.
• परिचारिकांना केवळ रुग्णसेवेची कामे देण्यात यावीत.
परिचारिकांचा राज्य सरकारला इशारा
• आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत
• महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आलं आहे.
• गेले दोन दिवस परिचारिकांनी सकाळी २ तास काम बंद आंदोलन केलं, पण कोणत्याही मागण्या न झाल्याने आता दोन दिवस कामबंद आंदोलन असणार आहे.
• म्हणून परिचारिका संघटनेकडून बुधवार-गुरुवार दिवसभर कामबंद आंदोलन पुकारलं आहे.
• सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे २५ तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरु करु, असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे.