मुक्तपीठ टीम
डॉक्टरांना देवासारखे मानले जाते. मात्र एखादा डॉक्टरच राक्षसीवृत्तीने वागू लागला सामान्य जनतेने करायचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. औरंगाबादमध्ये डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने तेथेच काम करणाऱ्या नर्सवर बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडितेला फ्लॅटवर आणि हॉटेलात नेऊन अनेकदा बलात्कार केला आहे. यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली असता, आरोपीनं गर्भपाताच्या गोळ्या देऊन विनासंमती तिचा गर्भपात केला आहे. त्यानंतरही डॉक्टर आणि त्याच्या मावस भावानेही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आता या डॉक्टर पिसाटला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दामिनी पथकाच्या मदतीने फिर्याद!
- याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना सोमवारी सिडको बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकाने फोन करून एका २५ वर्षीय तरुणीला मदतीची गरज असून ती प्रचंड घाबरलेली असल्याचं कळवले.
- त्यामुळे दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे आणि गिरिजा आंधळे घटनास्थळी पोहोचल्या.
- तेव्हा ती तरुणी घाबरलेल्या अवस्थेत दिसली.
- तिला विश्वासात घेऊन चौकशी केली.
- मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी आरोपी डॉक्टरसह तिघांवर बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- पोलिसांनी डॉ. प्रसाद संजय देशमुख (२४) याला अटक केली आहे.
- दीपक पाटील, सचिन शिंदे आणि शिंदेसोबतच्या अनोळखी मुलाचा पोलिस शोध घेत आहेत.
डॉक्टर पिसाटाची गुन्हेगारी वखवख
- गारखेड्यातील रुग्णालयात ही पीडिता नर्स म्हणून तीन महिन्यांपासून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
- याच रुग्णालयातील डॉ. प्रसादने तिच्यासोबत पडेगावातील फ्लॅटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं सांगितले.
- त्यामुळे ती गरोदर राहिली.
- तर प्रसादने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.
- पण रक्तस्राव होऊन तीव्र वेदना होत असल्याने ती प्रसादकडे गेली.
- पण आशा परिस्थितीत सुद्धा प्रसाद याने तिला परत सिडको चौकातील एका नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि निघून गेला.
- प्रसाद निघून गेल्यानंतर त्याच्या मावस भावानेदेखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
- परंतु पीडित नर्स त्याच्या तावडीतून सुटून आली.
- डॉक्टरच्या इतर दोन मित्रांनीही तिचा विनयभंग केल्याचे तिने आपल्या तक्रारीत सांगितले.
- यानंतर पीडितेला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेऊन तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.