मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप हा आजकाल जवळपास सर्वांच्याच जीवनाचा म्हत्वाचा भाग बनला आहे. कोरोना महामारीमुळे, या मेसेजिंग अॅपचा वापर खूप बदलला आहे. घरातून काम केल्यामुळे जेथे कर्मचारी व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयीन शिक्षणही त्यातून होत आहे. या अॅपद्वारे चॅटिंगसोबतच ऑडिओ-व्हिडिओ कॉल्स आणि डॉक्युमेंट्सही शेअर केले जाताता. त्याचबरोबर कंपनी युजर्सना सातत्याने अपडेट देत आहे. आता व्हॉट्सअॅपद्वारेही पेमेंट करणेही शक्य झाले आहे. परंतु व्हॉट्सअॅप इंटरनेटशिवाय अशक्य मानले जात असे, पण आता इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅप चालू शकते, अशी एक नवी सुविधा समोर आली आहे.
चॅटसिम वापरा, नेटवर्कची काळजी सोडा!
- इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी, एक विशेष सिम खरेदी करावा लागेल.
- या सिमचे नाव चॅटसिम आहे.
- याद्वारे इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅप चालू शकते.
- हे सिम ई-कॉमर्स वेबसाइटवरून ऑनलाईन खरेदी करता येते.
- किंवा Chatsim च्या वेबसाइट https://www.chatsim.com/ वरून ऑर्डर करू शकता.
चॅटसिम आहे तरी काय?
- चॅटसिम सामान्य सिमपेक्षा खूप वेगळी आहे.
- यामध्ये अनेक फायदे आहेत.
- देशात किंवा परदेशात कुठेही चॅटसिम वापरले जाऊ शकते.
- त्याची वैधता एक वर्ष आहे.
- चॅट सिमद्वारे अमर्यादित संदेश आणि इमोजी पाठवू शकता.
चॅटसिम ची किंमत आहे तरी किती?
- चॅटसिम सामान्य सिमपेक्षा महाग आहे.
- विकत घेतल्यास, ते वर्षभर वापरू शकता.
- त्याची किंमत 1800 रुपये आहे.
- नंतर रिचार्ज करून वैधता वाढवून मिळेल.