मुक्तपीठ टीम
आता स्मार्टफोनच्या जगात पुस्तक वाचकांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. सगळं काही स्मार्टली उपलब्ध होते. पण तो फिल नसतो. काहींना रोजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तक वाचण्यासाठी वेळ फार कमी मिळतो. पण आता रिक्षा प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुण्यातील पुस्तकप्रेमींनी फिरत्या वाचनालय सुरू केले आहे. रिक्षामध्ये सुरू केलेल्या या फिरत्या वाचनालयाला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे.
पुणे शहरात प्रियांका चौधरी यांनी मुक्त ग्रंथालय योजना सुरु केली होती. त्यांनीच आता फिरते ग्रंथालय सुरु केले आहे. या चळवळीत महाविद्यालयीन तरूणवर्गाने सहभाग घेतला आहे. याची सुरूवात मराठी भाषादिनी करण्यात आली. बालभारतीचे संचालक दिनकर पाटील आणि किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी या फिरत्या वाचनालयाचे उद्घाटन केले.
या ओपन लायब्ररी मूव्हमेन्ट म्हणजेच मुक्त ग्रंथालयाची चळवळ प्रियांका चौधरी यांनी पहिल्यांदी सुरू केली. त्यांनी या माध्यमातून आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात एकूण ४८ स्थायी वाचनालये सुरू केले आहेत. तसेच ४५ हजार पुस्तकांचे त्यांनी मोफत वाटप केले आहे.
लोकांपर्यंत हे फिरते वाचनालय पोहचून त्यांना या माध्यमातून ज्ञान आणि प्रेरणा साध्य व्हावी हीच अपेक्षा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रियांका चौधरी आणि अभिषेक अवचार यांचा यात पुढाकार तसेच सहभाग आहे. प्रियांकाने सांगितले की, ही पुस्तके मोफत आहेत. तसेच आपण ही पुस्तके घरी घेऊन जाऊनही वाचू शकतो.
पाहा व्हिडीओ: