मुक्तपीठ टीम
आजवर जे शक्य नव्हते ते आता शक्य होणाराय. आता मुलीही देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार २०२१-२०२२च्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश देण्यात येईल. मिझोरममधील सैनिक स्कूलमध्ये येथे २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षात पायलट प्रकल्प राबविला गेला आहे. तेथे मुलींना प्रवेश देण्यात आला. या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार मुलांबरोबरच आता सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश मिळेल.
सैनिक शाळा नवीन पद्धतीत उघडतील
सरकारने नवीन योजना प्रस्तावित केल्याचेही लोकसभेत सांगण्यात आले. याअंतर्गत, आता स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीत नवीन सैनिक शाळा देशात उघडल्या जातील.
प्रवेश असा मिळणार
• सध्या देशात ३३ सैनिक शाळा आहेत.
• त्या संरक्षण मंत्रालयांतर्गत सैनिक स्कूल सोसायटी चालवित आहेत.
• यामध्ये प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (एआयएसएसईई) चा समावेश आहे,जी राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) आयोजित करते.
पाहा व्हिडीओ: