मुक्तपीठ टीम
कोरोना संकटामुळे बहुतेक ग्राहक डिजिटल बँकिंगकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे, पण काहींना हे त्रासदायक वाटते. अशांसाठी सरकारी क्षेत्रातील बँकांनी एक समूह तयार करुन घर बसल्या बँकिंग सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. पीएसबी अलायन्स असे याला नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत ग्राहकांना १२ सरकारी बँकांची सुविधा मिळणार आहे. तसेच फक्त रक्कम काढणे आणि भरण्यासाठीच नाही तर त्याव्यतिरिक्त जीवन प्रमाणपत्र, चेक बुक यांसारख्या सुविधाही ग्राहकांना घर बसल्या मिळू शकणार आहेत.
बँक सेवांची होम डिलिव्हरी ग्राहकांच्या फायद्याची…
• बँकेच्या पीएसबी अलायन्स या महत्त्वपूर्ण सुविधेचा फायदा बँकांसह ग्राहकांनाही होणार आहे.
• बँकेतील उसळलेली गर्दी कमी होईल.
• बँकांना आपल्या ग्राहकांना जलद सेवा देता येईल.
• अशा प्रकरची सुविधा काही खासगी बँकांनी या आधीपासूनच आपल्या ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे, पण त्यांची सुविधा काही खास ग्राहकांसाठी मर्यादीत ठेवण्यात आली आहे.
• पीएसबी अलायन्समुळे प्रीमियम श्रेणीतील बँकिंग सुविधा सामान्य ग्राहकांनाही उपलब्ध होणार आहेत.
ग्राहकांना सुविधा कशी मिळेल?
• सरकारी बँकेचा समूह म्हणजे पीएसबी अलायन्स अॅप आणि त्याच्या टोल फ्री क्रमांकाद्वारे सुविधा देईल.
• या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचे खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
• अॅप असल्याने डेबिट कार्डची गरज भासत नाही.
• संबंधित अॅप नसल्यास डेबिट कार्ड किंवा पिनद्वारे पैसे काढण्याची आणि जमा करण्याची सोयही ग्राहकांना मिळेल.
ग्राहकांना कशी मिळेल माहिती?
• पैसे काढले किंवा जमा केल्याची माहिती ग्राहकांना दोन पद्धतीने दिली जाईल.
• एक म्हणजे तात्काळ एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.
• तर दुसरी म्हणजे डीएसबी एजंट रक्कम किंवा संबंधित प्रमाणपत्र बँक शाखेत जमा करेल त्यानंतर अंतिम एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.
त्या १२ बँकांमध्ये या बँकांचा समावेश
१. स्टेट बँक
२. बँक ऑफ इंडिया
३. बँक ऑफ बडोदा
४. पीएनबी
५. कॅनरा बँक
६. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
७. युनियन बँक ऑफ इंडिया
८. बँक ऑफ महाराष्ट्र