मुक्तपीठ टीम
कोणी दोरीवरच्या उड्या मारते. लागोपाठ उड्या मारतच राहते. थोडंही न थांबता दोरी घुमतच राहते. तर कोणी धावताना दिसते. हळूहळू…पटपट जसं जमेल तसं. व्यायम सुरु असतातच उद्देश असतो एकच वजन कमी करण्याचा. आता मात्र त्यावर अक्सिर इलाज लवकरच सापडण्याची शक्यताय. कारण अमेरिकन संशोधकांना लठ्ठपणाचे कारण शोधण्यात मोठे यश मिळाले आहे. त्यांनी १४ जीन शोधली आहेत ज्यांच्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. ही जीन हृदयरोग आणि मधुमेह सारख्या आजारांना जबाबदार असल्याचे मानले जातात. एवढंच नाही तर शास्त्रज्ञांनी वजन वाढण्यास प्रतिबंध करणारी तीन जीन देखील ओळखली आहेत. संशोधकांनी लठ्ठपणाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा रोखण्यात कोणत्या जीनची भूमिका आहे याचा अभ्यास केला. पीएलओएस जेनेटिक्स जर्नलमध्ये अभ्यासाचे परिणाम प्रकाशित झाले आहेत. हा अभ्यास लठ्ठपणा, आहार आणि डीएनए यांच्यातील नवीन माहिती गोळा करण्यास मदत करतो.
सुस्त जीवनशैली वाढवते लठ्ठपणा
- लठ्ठपणा वाढवण्यासाठी सुस्त जीवनशैली महत्वाची भूमिका बजावते.
- संशोधकांच्या मते, साखरेसह उच्च-कॅलरीयुक्त आहारामुळे लठ्ठपणा जागतिक महामारीचे रूप धारण करत आहे.
- चरबी साठवण्याच्या नियंत्रणासह, जीन आपल्या शरीरात ऊर्जा म्हणून अन्न वापरण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठातील कला आणि विज्ञान महाविद्यालयातील संशोधक एलिन ओरूरक म्हणाले, “आम्हाला माहित आहे की लठ्ठपणा आणि इतर रोगांसह जगणाऱ्या लोकांमध्ये शेकडो भिन्न जीन निर्माण होण्याची शक्यता आहे.” संशोधकांनी लठ्ठपणाशी संबंधित २९३ जीनकडे पाहिले, यापैकी कोणत्या जीनमुळे समस्या उद्भवते किंवा प्रतिबंध होतो हे शोधण्याचे ध्येय आहे.
-वाईट दिनचर्या, चुकीचा आहार आणि तणावामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह खूप वेगाने पाय पसरत आहेत.
-एका अहवालानुसार, प्रत्येक चौथा माणूस लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. -कोरोना महामारीच्या युगात, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढत आहे.