मुक्तपीठ टीम
आयपीएल २०२२ वर कोरोनाचं सावट घोंघावतंय. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू मिचेल मार्शचा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्याव्यतिरिक्त टीममधले फिजियो पॅट्रिक फारहार्ट आणि टीम डॉक्टर साळवीही पॉझिटिव्ह आढळले. यानंतर बुधवारी होणाऱ्या दिल्ली पंजाब सामन्यावर अनिश्चिततेचं सावट घोंघावू लागलं. हा सामना पुण्याला होणार होता. मात्र आता हा सामना मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक काढत ही माहिती दिली आहे.
मार्शसोबत टीममधले १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर १९ एप्रिलला इतर टीमची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. २० एप्रिलला सामन्याआधी पुन्हा चाचणी केली जाणार आहे.
नेमकं काय झालं?
- सर्वात आधी फिजियो पॅट्रिक फारहार्ट पॉझिटिव्ह आले
- दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारे ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली.
- यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
- सध्याचा ऑलराऊंडर मिचेल मार्श नुकताच पाकिस्तानातून भारतात आला आहे.
- मिचेल फारहार्ट च्या संपर्कात आला.
- क्वारंटाईनचे नियम पाळले गेल्यानंतर पुढची तपासणीची प्रक्रिया पार पाडली गेली.