मुक्तपीठ टीम
गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात तुफान पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे २०० हून अधिक विद्यार्थ्यांना देखील मोठा फटका या पावसामुळं बसला आहे. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. विद्यार्थ्यांनी आम्हाला पुन्हा संधी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाईल, असा दिलासा दिला आहे.
परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी
- राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
- या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत.
- मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच अॅग्रीसाठीच्या सीईटी परीक्षेपासून वंचित राहावं लागलं आहे.
- ही परीक्षा २० तारखेपासून १ तारखेपर्यंत सुरू आहे.
- अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.
- अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
- पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.
- यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे.
- याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही.
- विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.
‘महाराष्ट्राला ७ हजार कोटी रुपये द्या’, वडेट्टीवारांची मागणी
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागात शेती पाण्याखाली गेली आहे. पिकांचं नुकसान झाले आहे. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी रुपये दिले होते. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील नुकसान पाहता महाराष्ट्राला किमान ७ हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे.
त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना देखील आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
तसंच मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली