मुक्तपीठ टीम
आता अमेरिकेत आणखी एक इतिहास घडणार आहे. काही महिन्यांपूर्वीच कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दोन महिलांची नावे चीफ ऑफ मिलट्री कमांडपदी मान्यतेसाठी सिनेटकडे पाठविली आहेत.
जनरल जॅकलिन ओव्होस्ट आणि जनरल लॉरा रिचर्डसन अशी या महिला कमांडर्सची नावे आहेत. सिनेटच्या मान्यतेनंतर एकाचवेळी दोन्ही महिला सैन्यात प्रमुख पदांवर कार्यरत असतील. जॅकलिन अमेरिकन सैन्याच्या नॉर्थ कमांडच्या प्रमुख होत्या. अमेरिकन सैन्यात सर्वात मोठा रँक म्हणजे चार स्टार जनरलचा आहे. हा रॅंक हवाईदलाच्या जनरल जॅकलिन ओव्होस्ट यांनी साध्य केला आहे. २०२० मध्ये जॅकलिन या संरक्षण विभागातील एकमेव चार स्टार महिला जनरल आहेत. अमेरिकन हवाई दलातील महिलांमध्ये त्याचा पाचवा क्रमांक आहे. त्यांचे ट्रांन्सपोर्टेशन कमांड प्रमुख म्हणून नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून तीन स्टार जनरल लॉरा रिचर्डसन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
धक्कादायक बाब अशी की, माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भीतीने लॉरा आणि जॅकलिनची नावे पाठविण्यास उशीर झाला. अमेरिकन डिफेन्स हेडक्वार्टर ‘पेंटागन’ने गेल्या वर्षी या दोघींची नावे आधीच ठरवली होती. या दोघींच्या नावाला ट्रम्प मंजूरी देणार नाहीत अशी भीती अमेरिकेचे माजी डिफेन्स सचिव मार्क एस्परला होती. कारण दोघीही महिला आहेत. पण सत्ता बदलली आणि आता अखेरीस नवे अध्यक्ष बायडेन यांनी ५ मार्च रोजी ही नावे सिनेटला पाठविली.
पाहा व्हिडीओ: