मुक्तपीठ टीम
नॅशनल ऑटोमेटेड क्लीयरिंग हाऊसची सुविधा आता आठवड्यातून सातही दिवस उपलब्ध असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतीच याची घोषणा केली. १ ऑगस्टपासून ही व्यवस्था लागू होईल. याचा अर्थ असा आहे की, बँक खात्याच्या माध्यमातून येणारा पगार आता बँका बंद असल्या कारणांमुळे थांबणार नाही.
पगाराशिवाय आणखी कशासाठी फायद्याचे?
• कोणत्याही प्रकारचा मासिक हप्ता (ईएमआय) किंवा इतर कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह अन्य कोणत्याही प्रकारच्या निश्चित देय रक्कम आता त्याच दिवशी खात्यातून वजा केली जाईल.
• सध्याच्या व्यवस्थेनुसार, बॅंकांच्या कामकाजाच्या काळात नॅशनल ऑटोमेटेड क्लीयरिंग हाऊस ऑपरेशन्स सुरू असतात.
• याचा ग्राहकांसाठी एक फायदा असा आहे की, जर त्यांच्या खात्यात निर्धारित तारखेला ईएमआय रक्कम नसेल तर त्यांना बँकेच्या सुट्टीच्या वेळी खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पुरेशी रक्कम जमा करण्यासाठी संधी मिळेल आणि ईएमआय वजा होईल.
ठरल्या दिवशीच ठरलेले आर्थिक व्यवहार
• अनेक वेळा व्यावसायिकांना पगार, विविध प्रकारचे लाभांश आणि त्यांच्या खात्यावर निश्चित तारखेस नॅशनल ऑटोमेटेड क्लीयरिंग हाऊस सुविधा न मिळाल्यामुळे त्यांच्या खात्यात व्याज मिळत नाही.
• उदाहरणार्थ, जर पगाराची किंवा देय तारखेची मुदत सुट्टी दिवशी असेल तर, दुसर्या दिवशी ही रक्कम खात्यात जमा केली जाते.
• नवीन प्रणालीअंतर्गत, बँक खात्यात मासिक वेतन, रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस इतर कोणत्याही दिवशी नियोजित तारखेला येईल.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या सोयीसाठी आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) चा पुरेपूर फायदा देण्यासाठी आठवड्यातून सात दिवस नॅशनल ऑटोमेटेड क्लीयरिंग हाऊस सुविधा सुरू ठेवण्याचे ठरविले गेले आहे.