Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची ऑनलाईन विक्री, १५ ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केली सुरक्षाविषयक नोटीस

December 31, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
pressure cooker

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रेशर कुकरची विक्री करणार्‍या १५ ई-कॉमर्स कंपन्या आणि विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे. ग्राहक सुरक्षेसाठी सरकारने जारी केलेल्या वैधानिक आयएसआय मापदंड आणि ग्राहक संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  घरगुती प्रेशर कुकरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन नोटिसा आणि हेल्मेटसाठी क्यूसीओचे उल्लंघन केल्याबद्दल दोन नोटिसा बजावल्या आहेत.

 

प्रेशर कुकर आणि हेल्मेटमधील मापदंडाकडे दुर्लक्ष

  • या संदर्भात, मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीआयएसने घरगुती प्रेशर कुकरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन नोटिसा आणि हेल्मेटसाठी क्यूसीओचे उल्लंघन केल्याबद्दल दोन नोटिसा बजावल्या आहेत.
  • केंद्र सरकारने ग्राहकांना अलर्ट जारी करताना ग्राहकांना घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये आयएसआयची आवश्यकता काटेकोरपणे पाळण्यास सांगितले आहे आणि चिन्हाशिवाय उपकरणे खरेदी करू नका असा सल्ला दिला आहे.
  • एवढेच नाही तर विभागाने ६ डिसेंबर रोजीच सीसीपीए अंतर्गत सुरक्षा नोटीस जारी केली होती.
  • यामध्ये ग्राहकांना अनिवार्य मानकांचे उल्लंघन करणारे हेल्मेट, प्रेशर कुकर आणि एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याविरूद्ध चेतावणी दिली होती.

 

केंद्र सरकारने दिलेली अधिकृत माहिती विस्ताराने पुढील प्रमाणे आहे

वैध आयएसआय मानकाशिवाय आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या सक्तीच्या मानकांचे  उल्लंघन करणाऱ्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यापासून  केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ग्राहकांना सावध केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा  2019 च्या कलम 18(2)(j) अंतर्गत प्राधिकरणाने ही सुरक्षा नोटीस जारी केली आहे.

 

ग्राहकांना इजा आणि नुकसान पोहोचू नये यासाठी आणि आवश्यक सुरक्षा तसेच तांत्रिक  निकषांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय मानक ब्युरोच्या कलम  16 अंतर्गत, दर्जा  राखण्यासाठी आणि मानक चिन्हाचा अनिवार्य वापर करण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार  केंद्र सरकारला आहेत. गुणवत्ता नियंत्रण आदेश या स्वरुपात  हे निर्देश प्रसिद्ध केले जातात.

 

याआधी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 06.12.2021ला सुरक्षा नोटीस जारी करत, अनिवार्य निकषांचे उल्लंघन  करणाऱ्या हेल्मेट,प्रेशर कुकर,स्वयंपाकाचा, गॅस सिलेंडर खरेदी करताना ग्राहकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तूंची, ग्राहक अंतर्गत संरक्षण कायदा  2019 अंतर्गत सदोष म्हणून गणना होते.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने,बनावट वस्तूं विरोधात  याआधीच देशव्यापी मोहीम सुरु केली आहे.

 

सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची ऑनलाईन विक्री करणाऱ्या दोषी ई कॉमर्स कंपन्या आणि विक्रेत्यांची केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्वतःहून दखल घेत कारवाईला सुरवात केली आहे. या संदर्भात 15 नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 अंतर्गत आवश्यक कारवाईसाठी ही प्रकरणे भारतीय मानक ब्युरो कडेही सोपवण्यात आली आहेत. गुणवत्ता नियंत्रण  आदेशाचे  उल्लंघन केल्या बाबत भारतीय मानक ब्युरोनेही देशांतर्गत प्रेशर कुकरसाठी  3 तर हेल्मेट साठी 2 नोटीसा पाठवल्या आहेत.

 

The household goods in reference to which CCPA has issued Safety Notice are as under –

S.No. Name Line Ministry Standard Date of coming into force
1 Electrical Immersion Water Heaters DPIIT IS 302-2-201 (1992) 17.02.2003
2 Electric Iron DPIIT IS 302-2-3 (1992) 17.02.2003
3 Switches for domestic and similar purposes DPIIT IS 3854: 1988 17.02.2003
4 Domestic Gas Stoves for use with Liquefied Petroleum Gases DPIIT IS 4246:20020 01.06.2020
5 Microwave Oven MEITY IS 302 : Part 2 : Sec 25 : 2014 18.09.2021
6 Aluminium Foil for Food Packaging

 

DPIIT IS: 15392 17.08.2020
7 Hand-held Blender DPIIT IS 302 : Part 2 :Sec 14 01.05.2019
8 Domestic Electric Food
Mixer (Liquidizers and
Grinders) and Centrifugal Juicer.
DPIIT IS 4250 01.05.2019
9 Helmet for riders of Two

Wheeler Motor Vehicles

MoRTH IS 4151: 2015 01.06.2021
10 Sewing Machines DPIIT IS 15449 : Part 1 : 2004 01.09.2021
11 Cooking Gas Cylinder DPIIT As specified in Gas Cylinder Rules, 2016 22.11.2016

पाहा व्हिडीओ:


Tags: CCPACentral Consumer Protection Authoritycentral Governmente-commerce companiesmuktpeethViolation of standardsई-कॉमर्स कंपनीकेंद्र सरकारकेंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणप्रेशर कुकर आणि हेल्मेटमधील मापदंडमानकांचे उल्लंघनमुक्तपीठ
Previous Post

जे. जे. रुग्णालयात दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया!

Next Post

सर्व एमआयडीसी परिसरात इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार

Next Post
EV charging stations

सर्व एमआयडीसी परिसरात इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!