रोहिणी ठोंबरे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रचारादरम्यान संतोष परब या भाजपाविरोधी शिवसेना पॅनलच्या समर्थकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात आता राजकारण चांगलंच तापत आहे. आपला मुलगा आमदार नीतेश राणे पोलीस तपासात अडचणीत येत असल्याचे पाहून केंद्रीय मंत्री राणे सिंधुदुर्गात दाखल झाले. पण तेथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना दरडावत केलेले वक्तव्य त्यांना अडचणीत आणणारे ठरले आहे. राणेंनी पत्रकारांना नीतेश राणे कुठे आहे हे मला माहित आहे, पण तुम्हाला का सांगू, असा प्रश्न विचारला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पोलिसांनी संतोष परब हल्ला प्रकरणातील पाहिजे आरोपी नीतेश राणे यांची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हजर राहण्याची नोटीस अशी आहे…
सी.आर.पी.सी कलम १६० (१) अन्वये नोटीस
श्री नारायण नातू राणे, (केंद्रीय मंत्री, भारत सरकार) रा.ओम गणेश बंगला, कणकवली, जिल्हा-सिंधुदुर्ग यांना
विषय :- गुन्हयाचे तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर राहणेबाबत.
संदर्भ :- कणकवली पोलीस स्टेशन, जिल्हा – सिंधुदुर्ग गुन्हा रजि,क्रमांक ३८७२०२१ IPC कलम ३०७,१२०(ब), ३४ प्रमाणे.
आपणास या नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.३८७/२०२१ मा.द.वि. कलम ३०७,१२० (ब), ३४ या गुन्हयात श्री. नितेश नारायण राणे हे पाहीजे आरोपी असून त्यांचा ठाव ठिकाणा अथक प्रयत्न करून सुद्धा मिळून येत नाही व सदर आरोपीचा शोध जारी आहे.
आपण काल दि.२८.१२.२०११ रोजी पत्रकार परिषद घेतली होती. सदर गुन्हयाबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच एका पत्रकाराने आपणास पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यांच्या ठावठिकाणाबद्दल प्रश्न विचारला असता आपण श्री नितेश राणे हे कोठे आहेत ते सांगायला आम्ही मुर्ख आहोत का? असे विधान केले. तसेच सदरील बाबतीत आज दि. २९.१२.२०२९ रोजी रत्नागिरी टाईमस आणी इतर वृत्तपत्रातुन आपले सदर विधान प्रसिद्ध झाले आहे.
वरील सर्व बाबीचा सर्वक विचार करता असे दिसते की, श्री. नितेश राणे या आरोपोचा दाव ठिकाणा आपणास पुर्णपणे माहीती आहे.
तरी सदरील नोटीस मिळताच आपण पाहोने आरोपी श्री. नितेश राणे यास आमचे सर करावे. तसेच आपल्या पत्रकार परीषदेनुसार आपल्याला माहीती असलेल्या गु नोंदविण्यासाठी दि. २९.१२.२०२६ रोजी १५.०० वाजता कणकवली पोलीस ये आम समोर हजर रहावे.