मुक्तपीठ टीम
आयुर्वेद आणि योगाभ्यसातून उपचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंतजली संस्थेत कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती उत्तराखंड सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे सर्व माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकल्या. मात्र, पतंजली योगपीठाच्या प्रवक्त्यांनी त्याचा इंकार केला. त्यानंतर आता स्वत: बाबा रामदेव यांनी सरकारी दावा फेटाळून लावला आहे.
उत्तराखंड सरकारचा दावा
- १० ते २२ एप्रिल दरम्यान पतंजली योगपीठ मध्ये ४२, योगग्राममध्ये २८ आणि आचार्यकुलममध्ये ९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
- ही कोरोनाची नवी प्रकरणे एकाचा दिवशी समोर आलेली नसून गेल्या दीड महिन्यात येथे एकूण ११५ लोकांना संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे.
- पतंजलीमध्ये नवीन प्रकरणे सातत्याने समोर येत असल्याने आरोग्य विभागाने पतंजलीतील महत्त्वपूर्ण लोकांची कोरोना चाचणी करण्याची तयारी करत आहे.
- बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचीही लवकरच कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
काय म्हणाले बाबा रामदेव?
- पतंजली योगपीठाशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही. ही एक अफवा आहे.
- पतंजलीमध्ये येणाऱ्या सर्वांची प्रथम कोरोना चाचणी केली जात आहे.
- त्यातील पॉझिटिव्ह येणाऱ्या लोकांना आयसोलेट केले जात आहेत.
- सरकार खूप चांगले काम करत असून लवकरच या महामारीतून मुक्तता मिळेल.