Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्यांची जोपासना महत्त्वाची”

गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आयोजित व्हर्चुअल मुलाखतीत नितीनजी गडकरी यांचे प्रतिपादन!

October 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
guruji foundation interview

मुक्तपीठ टीम 

“आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, त्वरित निर्णयक्षमता, उद्यमशीलता या गोष्टी आवश्यक आहेतच पण त्याबरोबरच खरं बोलणे, फसवणूक न करणे, ज्येष्ठांचा आदर, शालीनता, सहजता, पारदर्शिता, मानवता, गुणग्राहकता आणि स्वीकारशीलता ही चिरंतन जीवनमूल्ये जोपासणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.” असे उद्गार मा. नितीनजी गडकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. या संस्थेच्या वतीने मंत्री महोदयांची व्हर्च्युअल मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

 

nitingadkari with GF

गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर्वांसाठी शिक्षण हे संस्थेचे ध्येय आहे. गरीब आणि वंचित कुटुंबातील विशेषतः ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थी विद्यार्थिनींना आर्थिक मदती बरोबरच सर्व प्रकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन ही संस्था करते. संख्यात्मक विकासापेक्षा गुणात्मक विकास, सर्वसमावेशकता, करिअरबाबत मार्गदर्शन, दातृत्वाची साखळी आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास ही या संस्थेची मूलतत्त्वे आहेत. आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना या संस्थेने मदत केली असून त्यातील अनेक विद्यार्थी आता उच्चपदस्थ आहेत.

 

कार्यक्रमाचा प्रारंभ रुचिका गिरडे व प्रियंका वंजारी यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाला. याची रचना मुकुंदराज कुलकर्णी यांची तर संगीत संयोजन डॉ. अश्विन जावडेकर यांचे होते. मा. मंत्रीमहोदयांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर गुरुजी फाऊंडेशनच्या मानवतावादी कार्याची माहिती फाउंडेशनचे विद्यार्थी विश्वा शेट्टी आणि गायत्री चिंगुरडे यांनी दिली. मुलाखत घेण्याचे काम मुकुंदराज कुलकर्णी, निमिषा दळवी आणि रिद्धी पागे यांनी केले. रवींद्र राठोड आणि कृष्णामाईची थिटे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रतिक्षा घरत आणि स्नेहल घोडके यांनी केले. तांत्रिक बाजू आदित्य कुलथे, शुभम लिंगायत आणि आर्यन दैव यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे संस्थापक डॉ प्रदीप वायचळ(मूळ गाव सोलापूर), हर्शिता गोयल, मोहन वराडकर, अविनाश सुर्वे इत्यादी मान्यवरांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यूट्यूब वरही उपलब्ध आहे.


Tags: guruji education foundationMinister virtual interviewNitin Gadkariगुरुजी एज्युकेशन फाउंडेशननितीनजी गडकरीमंत्री महोदय व्हर्च्युअल मुलाखत
Previous Post

कोरोना लसीचे १०० कोटी डोस! चीननंतर भारताचा महाविक्रम!

Next Post

महापुरुषांचे कार्य लोकांसमोर मांडण्याचा उपक्रम स्तुत्य

Next Post
महापुरुषांचे कार्य लोकांसमोर मांडण्याचा उपक्रम स्तुत्य

महापुरुषांचे कार्य लोकांसमोर मांडण्याचा उपक्रम स्तुत्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!