मुक्तपीठ टीम
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताचा पाया रचला असून आज जगामध्ये भारत म्हणून जे अस्तित्व आहे ते केवळ मात्र आंबेडकरी विचाराच्या पायाभरणी वरच आहे कदाचित बाबासाहेबांनी भारतातल्या कामगार,कष्टकरी,शेतकरी शेतमजूर,महिला तथा उपेक्षित वर्गाच्या हक्क अधिकाराची जी कायदेशीर मांडणी केली आहे व आपला देश लोकशाही,समता, स्वातंत्र्य,न्याय,बंधुता धर्मनिरपेक्षता,राष्ट्रीय एकता- एकात्मता,वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांवर ती जो उभा आहे तो ही कायद्याच्या रूपाने तो केवळ मात्र बाबासाहेबांच्या विद्वत्ता व लेखणी मुळेच उभा असून त्याकरता भारतीयांनी बाबासाहेबांच्या ऋणात राहिले पाहिजे ते जर त्याकाळी या देशाला संविधान रूपानं भारतीयांचा धर्मग्रंथ देऊ शकले नसते तर आजचा भारत कदाचित वेगळा असता असे मत स्टार प्रवाह टीव्ही चॅनेल वर प्रसारित झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकेचे निर्माते तथा राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी व्यक्त केले. ऐतिहासिक मुक्तिभुमी स्मारकास यावेळी वैद्य यांनी भेट दिली.
राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच त्यांनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळी विद्यार्थ्यांसी त्यांनी मुक्त संवाद साधला.
१९८० च्या सुमारास राष्ट्र सेवा दल या संघटनेत वैद्य सहभागी झाले.मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात उभा महाराष्ट्र पेटला असताना त्यात मुंबईतून १९८३ साली सहभाग घेतला मुंबई येथे नामांतर वादी समितीची स्थापना झाली त्याचे सचिव पद नितीन वैद्य यांनी भूषवले होते.मराठी दैनिकांन मधुन पत्रकारिता करत पुढे मराठी चित्र वाहिणींची निर्मिती करण्यात नितीन वैद्य यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली असून धारावाईक- मालिकांची निर्मिती त्यांनी सुरू केली. बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर मालिका बनवण्याचे धाडस कुठलीही चित्रवाहिनी करत नाही हे वास्तव त्यांनी या वेळेला सांगताना बाबासाहेबांचा प्रेरक इतिहास नव्या पिढीसमोर सुव्यवस्थितपणे मांडणे आवश्यक असल्याने ही मालिका बनवण्यासाठी मला निर्माता व्हावं लागलं असे सांगून हे धाडस अन्य कोणी निर्माता करत नव्हता,ज्या वेळेला ही मालिका करण्याचं ठरलं त्यावेळेला केवळ दोनशे भागांची मालिका करायची असा विचार होता लोक विचारत होते बाबासाहेबांचे विचार मालिकेतून तुम्ही कसे दाखवणार बाबासाहेबांचे विचार तर या मालिकेतून सांगितले आहेतच पण बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण कशी झाली हे दाखवून एक निर्माता म्हणून माझे ध्येय होते प्रत्यक्ष पुढे ही मालिका ३४३ भागांची तयार झाली आहे. मालिकेतील कलाकार सुद्धा अत्यंत लोकप्रिय झाले.बाल भिवा हा नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील आहे ज्याचे नाव अमृत गायकवाड असे आहे मिलिंद अधिकारी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांची भूमिका केली चिन्मय यांनी बाबासाहेबांचे आईची भूमिका केली हा परिवार देखील अत्यंत सुसंस्कृत सुशिक्षित आणि तितकाच बाबासाहेबांच्या कार्याप्रती समर्पित असा आहे. कारण रवींद्र सुर्वे चिन्मय चे वडील व त्यांचे आई १९७८ च्या नामांतर आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले होते यानिमित्ताने सर्वांना बाबासाहेब कळावेत हाच उद्देश आम्ही मालिका बनवितांनी ठेवला होता आज या मालिकेतील सर्व कलाकार हे जवळपास बौध्देत्तर आहे परंतु त्यांच्या प्रत्येकाच्या घरात आज बाबासाहेबांची प्रतिमा आहे याला कारण की त्यांनी राष्ट्रवादी बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले आणि ते स्वीकारले आहेत. सागर देशमुख या सुप्रसिद्ध कलावंताने बाबासाहेबांची केलेली भूमिका सर्वांना फार भावली रमाई तर लोकांचा काळजाचा ठाव घेत राहिली चांगदेव खैरमोडे यांचे साहित्य आम्ही ही मालिका तयार करण्यासाठी घेतले होते ते साहित्य आम्हाला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले आहे.चांगदेवराव खैरमोडे यांनी बाबासाहेबांचे प्रत्यक्षदर्शी किंबहुना बाबासाहेबांचे एकेकाळचे सहकारी अशी त्यांची ओळख आपल्याला आहे त्यांच्या नातवाने त्याकाळी या साहित्य पुस्तकावर ही मालिका उभी करण्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केले. किंबहुना तशी परवानगी देण्याच्या आधीच आमची पण त्यांनी परीक्षा घेतली.बाबासाहेब आंबेडकरांना चांगदेवरावांच्या नातवाने पाहिले होते त्या वेळेला त्यांना २८ रुपयाची मिळालेले बक्षीस हे कुणाला देणार असे चांगदेवराव यांनी त्यांना विचारले असता ते बक्षीस मी बाबासाहेबांच्या चळवळीला देईल असे बालवयात चांगदेवरावांच्या नातवावर संस्कार झाले होते. या मालिकेत बाबासाहेबांचे जीवन कार्य व तत्त्वविचार लोकमानसात मांडणे ही मोठे काम होते चवदार तळ्याचा सत्याग्रह,मनुस्मृती दहन,काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे प्रसंग उभे करणे आणि त्याचा सखोल अभ्यास करून ते मांडणं हा प्रसंग अंगावर आजही क्षारे आणणारा आहे. मनुस्मृती दहन प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांनी भगव्या वष्रे धारीसाधुसंत यांना ही आपल्यात सहभागी करून घेतले होते त्यांना मनुस्मृती दहना साठी प्रेरित करताना आपली भूमिका त्यांनी त्या वेळेला समजून सांगितले होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या सत्याग्रहात मनुस्मृती दहनाचा प्रसंगी जयघोष करण्यात आला आणि महात्मा गांधी यांची प्रतिमा या मनुस्मृती दहन प्रसंगी घटनास्थळी ठेवण्यात आली होती हि बाब आपण कार्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सुरबानाना टिपणीस माझ्या नात्यातले आहेत त्यांच्या विचार-कार्याचा वारसा आणि प्रेरणा माझ्यातही आहेच ती प्रेरणा आज मला या मालिकेच्या निर्मितीसाठी बळ देऊन गेली आहे.बाबासाहेबांचे ऋण किती आणि काय सांगावे माझ्या आईला (अर्थात तमाम भारतीय महिलांना) आज मेटरनिटी अर्थात गरोदरपणातील सहा महिन्यांची बाळंतपण पगारी रजा मिळण्याचे उपकार हे बाबासाहेबांचेच आहेत ही जाणीव तमाम भारतीय महिला मातांना असली पाहिजे.कामगार हिताचे कायदे,रिझर्व बँकेची स्थापना,वीज मंडळाची स्थापना, नदीजोड प्रकल्प,धरणांची निर्मिती-बांधणी,एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अशा एकना अनेक मूलभूत हक्क अधिकाराच्या सोयीसुविधा कामगारांच्या आणि माणूस म्हणून व्यक्तीच्या बाबासाहेबांनी तुम्हा मला बहाल केल्या आहेत.
या मालिकेत बाबासाहेबांचा मृत्यू जाणीवपूर्वक दाखवलेला नाही कारण बाबासाहेब तुमच्या-माझ्या मनात सदैव जिवंत राहिले पाहिजे.हा मुख्य उद्देश असं करण्यामागे आहे १४ ऑक्टोबर १९५६ चाली बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः दीक्षित होऊन आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्यातील बावीस प्रतिज्ञा पूर्ण दाखवणे आणि एखाद्या चित्र वाहिनीने त्यासाठी परवानगी देणे ही मोठी गोष्ट स्टार प्रवाहने यानिमित्ताने केली आहे.ही मालिका बनवायला घेतली त्यावेळेला पहिल्या बैठकीमध्ये मी चित्रवाहिणीच्या प्रमुखांना ही गोष्ट स्पष्टपणे बोललो होतो की ह्या मालिकेत बाबासाहेबांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी घडलेले प्रसंग आपल्याला टाळता येणार नाही आणि जे घडले नाही ते घालता येणार नाही,या मुख्य गोष्टी वरतीच मी निर्माता म्हणून ही एकूण ३४३ भागांची मालिका निर्माण करू शकलो.
आजच्या घडीला एखाद्या चित्रवाहिनी च्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा दाखवणे हे मोठं काम आहे.बाबासाहेबांमुळे जे पद हक्क अधिकार आपल्याला मिळाले आहेत त्या पदाचा सुयोग्य वापर करणे आणि त्याला न्याय देणे हे कुठल्याही अनुयायी-कार्यकर्त्यांचे कामच असतं त्याचा अनुवंश मला होता आलं याचा मला आनंद आहे असे नितीन वैद्य या वेळी बोलतांना म्हणाले.
येवला येथील बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा आणि त्याचा प्रसंग हा इथे प्रत्यक्ष येऊन चित्रित करावा असा आग्रह माझे साथी प्रा.शरद शेजवळ यांनी माझ्याकडे सातत्याने धरला होता परंतु त्यातल्या आर्थिक,मानसिक,शारीरिक तयारी,त्यामागचे कष्ट तो सेट उभा करण्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा ह्या गोष्टी अधिक खर्चिक असल्याने आम्ही येवला येथे येणे टाळले तसे अन्य ठिकाणी जाणे सुद्धा टाळले होते परंतु आज या ठिकाणी जेव्हा मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय आणि राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिका येऊन बघतो आहे तर मला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली व्यवस्था आणि त्यातही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यातला शिका आपण अनुसरत आहात याचा मला विशेष आनंद होत आहे.
कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा आहे वेटिंग फॉर विजा हा हा कोलंबिया विद्यापीठात लिहून घेण्यात आल्याचा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिव्यातून आपले जीवन व्यतीत केलं आहे ते समजून घ्यायचा असेल तर तो ग्रंथ अभ्यासला पाहिजे,बाल वयामध्ये बैलगाडीतून नाकारलेला प्रवास कुठेतरी रस्त्याच्या कडेला साचलेले डबके पाणी पिण्यास द्यायला सांगणे हे प्रसंग आजही काळजाला खोल भूक पाडतात असे वैद्य म्हणाले.
आम्ही मालिकेत दाखवलेले अत्यंत करून व्यथित करणारे प्रसंग जेव्हा प्रेक्षक पाहत होते त्यातील बाबासाहेबांच्या वडिलांचे निधन बाळाराम यांचे निधन आणि रमाईचा निधनाचा प्रसंग हा काळीज हेलावून टाकत होता ते सारे प्रसंग टिपताना चित्रीत करताना आम्ही ही तितकेच गैवरत होतो त्या दरम्यान प्रेक्षक आम्हाला अक्षरशः रडत रडत फोन करत आणि आपल्या सद्भावना,आम्ही करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला अधिक प्रोत्साहित करत होते.
भविष्यात आता मी पुन्हा ज्या विचार वर्षातून आलेला आहे तो फुले-शाहू-आंबेडकरी समाजवादी विचार वारसा मी एका नव्या मालिकेत सावित्री-ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याची संबंधित असून ती हिंदीमध्ये येणार आहे त्यासाठी आता माझे काम चालू आहे असे वैद्य म्हणाले.
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक मुक्तिभूमी वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केलेल्या रचनात्मक कामाचा यावेळी वैद्य यांनी गौरव केला. ऑनलाइन संविधान साक्षरता चाचणी परीक्षा व वामनदादा कर्डक यांच्या गीतांच्या प्रचार प्रसार कार्याचे त्यांनी विशेष दखल घेत गौरवोद्गार काढले.
प्रास्ताविक शरद शेजवळ यांनी केले.यावेळी येवला पंचायत समितीचे माजी सभापती व स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघ सामाजिक कार्यकर्ते सुरेश खडे विकास वाघुळ अभिमन्यू शिरसाठ डॉक्टर केदारे बिडी खैरनार सर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तिभुमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका चे संस्थापक प्रा शरद शेजवळ यांनी केले तर सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ यांनी केले.
मुक्ती भूमी स्मारक भेटीप्रसंगी येथील पल्लवी पगारे सिद्धार्थ हिरे यांनी नितीन वैद्य यांचा सत्कार केला. विकास शिंगाडे,जीवन दवंडे,तन्मय पगारे,सचिन भंडारे, शुभांगी मढवई,प्राजक्ता जाधव, भाग्यश्री साळवे,दिपाली वाहुळ, अक्षय गरुड,साहिल जाधव, रोहित गरुड,अस्मिता पगारे प्रथमेश गांगुर्डे,योगेश वाघ आदी विद्यार्थी,बार्टी चे कर्मचारी यावेळी उपस्थित होते आभार डॉ बाबासाहेब आंबेडक वसतीगृह अधीक्षक बी.डी खैरनार यांनी मानले.