मुक्तपीठ टीम
समाजातील कोणतीही समस्या असली तरी तिचा सर्वात मोठा फटका महिलांनाच बसतो. एका अभ्यासानुसार भारतातील खेड्यातील ७० टक्क्यांहून अधिक महिलांचा वेळ पाणी भरण्यासाठी जातो. एप्रिल सुरु झाल्यावर आता अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दर उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी-अधिक प्रमाणात असतेच असते आणि स्त्रीयांची वणवण वाढते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी नीलकमल या कंपनीने उपाय शोधला आहे.
निलकमलने देशातील परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ढकलगाडी कम ड्रम तयार केला आहे. या ड्रमला लोखंडी आकडा लावायचा व जमिनीवर ठेवून तो ड्रम ढकलगाडी प्रमाणे ढकलत आणायचा अशी व्यवस्था आहे. निलकमलच्या ढकलगाडी ड्रममध्ये ४५ लिटर पाणी मावेल एवढी क्षमता आहे. त्याच्या सर्व पद्धतीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
त्यासाठी निलकमलने हे ढकलगाडी ड्रम सर्वत्र उपलब्ध केले आहेत. त्यांचा उपयोग कोणत्याही गरीब आणि गरजू महिलेला होईल. कंपनीच्या सीएसआर मधून कोणाला असे ड्रम भेट द्यायचे असतील तर सवलतीत देता येतील. त्याची माहिती निलकमलच्या वेबसाइटवर मिळू शकेल. आपली ही एक छोटीशी भेट त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकेल
पाहा व्हिडीओ: