मुक्तपीठ टीम
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपला मोर्चा वळवला आहे. सोमवारी सकाळी दाऊदशी संबंधित मुंबईतील जवळपास २९ ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ भेंडीबाजारात छापेमारी करण्यात आली आहे.
दाऊदच्या संबंधित मालमत्तांवर कारवाई
- राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.
- त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे.
- आजची कारवाईही त्याचाच एक भाग आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद गँग मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती.
- त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.
- याच माहितीच्याआधारे एनआयएने आजची कारवाई केल्याचे सांगितले जाते.
- राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊदवर यूएपीए कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्यापासून दाऊदशी संबंध असलेल्या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
काय आहे प्रकरण?
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधितांवर कारवाई केली आहे.
- २० ठिकाणांमध्ये शार्प शूटर, तस्करांचा हात आहे.
- याशिवाय अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.
- मुंबईच्या नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजारात छापेमारी सुरु झाली आहे.
- एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, जावेद चिकना, इकबाल मिर्ची आणि इतर लोकांसोबत दाऊदनं आपलं नेटवर्क उभं केलं होतं.
- हे लोक व्यावसायिकांना टार्गेट करायचे.
- एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती यापूर्वी आम्हाला मिळाली होती.
- त्यावरुनच कारवाई करण्यात आली आहे.