मुक्तपीठ टीम
देशात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन व्यवस्था विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन म्हणजेच एबीडीएमची अंमलबजावणी करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. डिजिटल आरोग्य मिशन व्यवस्था उभारण्यासाठी काही नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचवण्यासाठी स्वारस्यपत्रे (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) सादर करावीत, असे खुले आवाहन केले आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे या व्यवस्थेच्या विकासाला तर गती मिळाल्याने डिजिटल आरोग्य सेवा सर्वसामान्यांना आणि खाजगी घटकांनाही सहज उपलब्ध होऊ शकतील.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम)चा उद्देश
- या मिशनचा उद्देश एक असा निर्वेध ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित करणे आहे, ज्यामुळे डिजिटल आरोग्य व्यवस्थेअंतर्गत आंतर-कार्यान्वयन शक्य होईल.
- “डिजिटल बिल्डिंग ब्लॉक्स’ प्रमाणे ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
- यातील प्रत्येक ब्लॉक, एक ‘डिजिटल पब्लिक वस्तू’ म्हणून समजला जाईल.
- ज्याचा वापर, कोणत्याही घटकाकडून, डिजिटल आरोग्य व्यवस्थेत केला जाऊ शकेल.
- यातून या व्यवस्थेला महत्वाच्या क्षमता मिळतील.
- आयुष्मान भारत डिजिटल मिशनची संकल्पना साकार होण्यात यामुळे मदत होईल.
या संदर्भात अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे. :
https://abdm.gov.in/assets/uploads/eoi_docs/Open_Call_for_Expression_of_Interest_(EoI)_vF.pdf
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण सर्व प्रकारचे तंत्रज्ञान प्रदाते/व्यक्ती यांच्यासोबत सहकार्याने काम करण्यास उत्सुक आहे.अशा उपाययोजना सार्वजनिक किंवा खाजगी घटकांना, सेवा म्हणून, मोफत सुचवण्यास/देऊ करण्यास उत्सुक असलेल्या लोकांनी आपली स्वारस्यपत्रे एनचए कडे पाठवावीत. ही स्वारस्यपत्रे, abdm@nha.gov.in. या ईमेल आयडी वर मेल पण करता येतील.