परदेशात भारतीय भाषांचा राजकीय डंका वाजविणारी घटना घडली आहे. भारतीय वंशाचे खासदार डॉ. गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृतमध्ये शपथ घेत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या निवडणुकीत हेमिल्टन वेस्टमधून लेबर पार्टीकडून गौरव शर्मांनी निवडणूक लढवली होती. लेबर पक्षाच्या शर्मा यांनी नॅशनल पार्टीच्या मासिंदो यांना ४ हजार ३८६ मतांनी पराभूत केले. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये निवडणूकही लढवली होती. राजकारणात रस असल्यामुळे शर्मा यांनी २०१४ मध्ये स्वयंसेवक म्हणून पक्षात प्रवेश केला. यावेळी दुसऱ्यांदा लढताना ते थेट संसदेत पोहचलेयत.
गौरव शर्मा यांनी आपल्या निवडणुकीवर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल म्हणाले की, भारतीय समाजातील लोकांना राजकारणात फार रस आहे. त्यामुळे मला भरपूर पाठिंबा मिळाला आहे. वर्णभेद सगळीकडेच चालते आणि म्हणून त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.
शर्मा यांचे वडील गिरधर शर्मा हे राज्य विद्युत विभागात कार्यकारी अभियंता आहेत आणि आई पौर्णिमा शर्मा गृहिणी आहेत. गौरव यांनी हमीरपूर येथे चौथीपर्यंत आणि धर्मशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्याचे वडील कुटुंबासमवेत न्यूझीलंडला गेले. आईकडून प्रेरणा घेऊन ते मेडिकल क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यानंतर ते विद्यार्थी असतानाच राजकारणात दाखल झाले.