मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत ट्रेनचे नवे मॉडेल लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ही देशातील वंदे भारतची तिसरी ट्रेन असेल आणि ती १२ ऑगस्ट रोजी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून चाचणीसाठी रवाना होईल. वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि आरामदायी सुविधांसह अनेक बाबींची काळजी घेण्यात आली आहे. सध्या वंदे भारत ट्रेन दिल्ली ते कटरा आणि दिल्ली ते वाराणसी दरम्यान चालवली जात आहे.
वंदे भारत ट्रेनची चाचणी १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार
- दक्षिण भारतातील विशेष मार्गावर ही ट्रेन धावण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेनची चाचणी १५ ऑगस्टपूर्वी सुरू केली जाईल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईहून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची शक्यता आहे.