मुक्तपीठ टीम
रॉयल एनफिल्ड भारतामध्ये एक प्रसिध्द बाइक ब्रँड आहे. दमदार असणारी ही मोटर सायकलची शान आता अपडेटेड फिचर्सनी वाढणार आहे. रॉयल एनफील्डच्या मोटरसायकलींना भारतात शान की सवारी म्हणून बघितले जाते. इतर मोटर सायकल्सच्या फीचर्ससोबत तुलना करता रॉयल एनफिल्डमध्ये कमी फिचर्स दिसतात. आता मात्र लोकांची गरज आणि बाजारातील स्पर्धा लक्षात घेत रॉयल एनफिल्ड आपल्या मोटर सायकलींना चांगल्या फीचर्ससोबत अपडेट करीत आहे. येणाऱ्या काही महिन् कंपनीयात रॉयल एनफिल्डच्या काही चांगल्या मोटरसायकल बाजारात आणणार आहे.
नॉब स्टाइल इग्निशन स्विच
• जेव्हा तुम्ही नवीन रॉयल एनफिल्ड मोटरसायकलला तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा तुमचे लक्ष सर्वात आधी ह्या बाईकच्या नवीन नॉब स्टाइल इग्निशन स्विचवर जाईल.
• हा स्विच फक्त पाहण्यासाठी आकर्षक नाही, तर त्यामुळे बाईक स्टार्ट करणेही खूप सोपे झाले आहे.
डेडिकेटेड ट्रिपर डिस्प्ले
• रॉयल एनफिल्डची अपकमिंग मोटारसायकलीत सेमी डिजिटल स्पीडोमीटरसोबत एक ट्रिपर डिस्प्लेही दिला जाणार आहे.
• ज्यात तुम्ही नेव्हिगेशन करू शकता.
• हा डिस्प्ले तुम्हाला टर्न बाय टर्न डायरेक्शन देईल.
• ट्रिपर गूगल पॉवर्ड आहे.
• तुम्ही रस्ता विसरले असाल तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर पोचू शकता.
• धाडस आवडणाऱ्यांना हे फीचर खूप आवडेल.
रॉयल एनफिल्ड रोडस्टर
• रॉयल एनफिल्ड पुढच्या वर्षा पर्यंत २०२२ मध्ये बाजारा मध्ये नवीन रॉयल एनफिल्ड रोडस्टर बाईकला लॉन्च करू शकते.
• या मोटासायकलची टेस्टिंग सुरु आहे.
• या मोटासायकलीत टियरड्रॉप फ्यूएल टॅंक, स्प्लिट सीट्स आणि एलॉय व्हील आहे.
रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०
• ही कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे.
• रॉयल एनफिल्ड क्लासिक बाईकला अपडेट केले जात आहे.
• कंपनी नवीन मॉडेल पुढच्या वर्षी बाजारात आणेल.
• ही नवीन बाईक जे१ – ३४९ मोटर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
रॉयल एनफिल्ड हंटर ३५०
• रॉयल एनफिल्डच्या रेंजमध्ये एक नवीन नाव रॉयल एनफिल्ड हंटर ३५०चे आहे.
• या बाईकबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
• कंपनी हे मॉडेल पुढच्या वर्षी लॉन्च करू शकते.