मुक्तपीठ टीम
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर सर्व गणेश भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. हे फक्त मुंबईचेच नाही तर महाराष्ट्र व देशातील कानाकोपऱ्यातील भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. २ मार्च रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अशा परस्थितीत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त सिद्धिविनायक मंदिरात जमतात. परंतु राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने काही नियम बनवले आहेत.
जे सर्व भक्तांसाठी अनिवार्य आहे. जर भाविकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या ट्रस्टने सर्व भाविकांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले आहेत. जे दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करतात त्यांनाच दर्शन घेण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच मंदिरात पोहोचल्यावर या रजिस्ट्रेशनचा क्यूआरकोड स्कॅन केला जाईल तेव्हाच भाविकांना प्रवेश देण्यात येईल.
सध्या एका तासामध्ये किती भाविकांना दर्शन घेता येईल. याबाबत मंदिर प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या नियमांचे पालन करणे बंधणकारक करण्यात आले आहे.