मुक्तपीठ टीम
ग्लोबल कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती थांबवली आहे. काही कंपन्या अशा देखील आहेत, ज्या कर्मचार्यांच्या संख्येवर पुनर्विचार करत आहेत, काही कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहेत. यात मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या दिग्गज कंपन्याचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, ते अनेक नोकऱ्या कमी करत आहेत, गुगल पुढील दोन आठवड्यांसाठी नोकरभरती थांबवत आहे.
दिग्गज कंपन्यांवर आर्थिक मंदीमुळे टाळेबंदी!
नेटफ्लिक्सनेही केली कर्मचारी कपात
- नेटफ्लिक्सने २०२२ मध्ये सबस्क्रायबर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घट करण्याचा आदेश दिला आहे.
- एप्रिलमध्ये त्याने विपणन धोरणे एकत्र करण्यास सुरुवात केली.
- त्यानंतर कंपनीने मे महिन्यात १५० आणि जूनमध्ये ३०० कर्मचाऱ्यांची कपात केली.
गुगलने कमी केला भरतीचा वेग
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने आपल्या भरती प्रक्रियेचा वेग कमी केला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या महिन्यात कर्मचाऱ्यांना सांगितले की, सध्या गुगल नवीन नियुक्ती कमी करेल आणि इंजिनीअर आणि तांत्रिक प्रतिभांना प्राधान्य देईल. हायरिंग पॉज हा त्या मंदीचा एक भाग आहे.
अॅमेझॉनची कर्मचार्यांसाठीच्या नवीन सुविधांना स्थगिती
- अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात भरतीमध्ये वाढ केली होती, परंतु आता ती संख्या कमी करणे आवश्यक आहे.
- अॅमेझॉनचे मुख्य आर्थिक अधिकारी, ब्रायन ओल्साव्हस्की म्हणाले, “कोरोनाच्या नवीन प्रकाराचा धोका कमी झाल्याने आणि कर्मचारी सुट्टीवरून परत आल्याने, आमच्याकडे खूप लवकर कर्मचारी कमी झाले. यामुळे उत्पादकता कमी झाली आहे.”
- अॅमेझॉन अमेरिकेतील काही वेअरहाऊस जागा भाड्याने देत आहे.
- त्यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांसाठी नवीन सुविधांना स्थगिती दिली आहे.
मेटाच्या अभियंता भरतीत किमान ३० टक्के कपात
- फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्मने अभियंत्यांच्या भरतीत किमान ३० टक्के कपात केली आहे.
- सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांना अलिकडच्या दिवसातील सर्वात वाईट मंदीची भीती वाटते. मार्चअखेर कंपनीकडे ७७,८०० कर्मचारी होते.
कॅरव्हान ऑनलाइन रिटेल कंपनीने आपल्या १२ टक्के कर्मचाऱ्यांना बरखास्त केले
कॅरव्हान, ऑनलाइन रिटेल कंपनी जी सेकंड-हँड कारचे व्यवहार करते, मे महिन्यात २ हजार ५०० लोकांना कामावरून काढून टाकले, जे त्यांच्या कर्मचार्यांपैकी सुमारे १२ टक्के होते.