मुक्तपीठ टीम
करोनाकाळात आय ई एस संस्थेकडे रु ३२५ कोटी नफा असताना देखील, पालकांना करोनाकाळात आर्थिक परिस्थिती मुळे शुल्क भरता न आल्याने त्यांचा विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केले होते, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे व आप नेते नितीन दळवी व ईतर पालकांनी पुरव्यासहीत मुंबई विभागिय तक्रार निवारण समिती समक्ष केली होती, या तक्रारी च्या अनुषंगाने आय ई एस संस्थेची रु ३२५ कोटींच्या नफेखोरी संबंधी चौकशी करावी असे आदेश समितीने मुंबई विभागिय शिक्षण संचालक संदिप संगवे यांना दि ०४/०७/२०२२ रोजी दिले होते.
निकालात आई एस संस्थेची रू ३२५ कोटींच्या नफेखोरी संबंधी चौकशी करावी असे आदेश असताना देखील संस्थेला एवढया मोठया प्रकरणात पाठिशी घालण्यासाठी उपसंचालक संदिप संगवे यांनी संस्थे ऐवजी संस्थे द्वारे चालविण्यात येणाऱ्या एका शाळेची चौकशी केली असे माहिती अधिकारात आलेल्या माहिती वरुन नितीन दळवी यांच्या निदर्शनास आल्यावर दळवीनीं मुंबई विभागिय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष नितीन उपासनी यांच्याकडे दि ०६/१२/२०२२ रोजी तक्रार दाखल केल्यावर, समितीने आय ई एस संस्थेच्या रुm नफेखोरी प्रकरणी चौकशी करायचे नव्याने आदेश दि ०२/०१/२०२३ रोजी मुंबई विभागिय शिक्षण संचालक यांना पारीत केले, तसेच फौजदारी/न्यायालयीन करावी व अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.
स्पष्ट निर्देश असतान वेळकाढूपणा व संस्थेला पाठिशी घालण्यासाठी उपसंचालक संदिप संगवे यांनी चुकीची चौकशी केल्याचा आरोप नितीन दळवी यांनी केला आहे.
आता नवीन आदेशानुसार संस्थेची चौकशी करावी अशी नितीन दळवी यांनी मागणी केली आहे.