मुक्पीठ टीम
“फेडरेशन ऑफ ऑर्गनॲन्डबॉडी डोनेशन” या “अवयवदान आणि देहदान” या संकल्पनेच्या प्रसारासाठीकार्यरत असणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदी वसई (जि. पालघर) येथील उद्योजक पुरुषोत्तम पवार, तर सचीवपदी पुणे येथील चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत कुळकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईत मावळते अध्यक्ष सुप्रसिध्द समाजसेवक एच. के. सावला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षम्हणून विनोद हरीया (मुलुंड), सुधीर बागाईतकर (नवी मुंबई) व सुनिल देशपांडे (नाशिक), खजिनदारम्हणून श्री. शैलेश देशपांडे, संयुक्त सचीवम्हणून प्रशांत पागनीस तसेच कार्यकारणी सदस्यम्हणून मीरा सुरेश, डॉ. कामाक्षी भाटे, वंदना वानखेडे, डॉ.शुभदा कुडतरकर, अनिरूध्द कुळकर्णी, सतीश पाटणकर आणि एन.पी.अय्यर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे मुख्य समन्वयकम्हणून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
अवयवदान आणि देहदान ही कृती काळाची गरज आहे, हे ओळखून या विषयात देशभर कार्यरत सर्व छोट्या-मोठ्या सेवाभावी संस्थांना एकत्र आणून एकमेकांशी संलग्नकरून ही चळवळ जोमाने पुढे नेण्याच्या उद्देशाने “द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन” ही नोंदणीकृत संस्था कार्य करीत आहे. या नोंदणीकृत संस्थेची रितसर स्थापना २७ मे २०१५ रोजी झाली असून ही संस्था भारत सरकारच्या राष्ट्रीयकृत रोटो सोटो (ROTTO-SOTTO) या संस्थेची संलग्न संस्था (ॲसोशिएट एन्जिओ) म्हणूनही कार्य करीत आहे.संस्थेचे सर्व पदाधिकारी हे अवयवदान आणि देहदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. संस्थेच्यामाध्यमातून सध्या संपूर्ण महाराष्ट्रातअवयवदान आणि देहदानासाठी जनजागृती केली जात आहे. त्यासाठी संस्थेतर्फे गेल्या चार वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चार पदयात्रा काढण्यातआल्या आहेत. या पदयात्रांच्या माध्यमातून तिच्या मार्गावरील सर्व गावे आणि प्रमुख शहरातील सर्वसामान्य जनतेलासभा, कार्यशाळा, पदनाट्य अशा माध्मातून अवयवदान आणि देहदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.