मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे मुंबई होयकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. आदेशानंतर देशमुख यांनी स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पदाचा पदभार कोण स्वीकारमार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर राज्याचे गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विश्वासातील मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेले आहे.
दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनुभवी नेत्यांपैकी एक मानले जाते. वळसे पाटलांकडे सध्या उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडील उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर कामगार विभागाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
दिलीप वळसे पाटील यांची कारकीर्द
- दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा विधानसभेवर निवडून गेले असून विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
- २००९ ते २०१४ या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.
- कधीकाळी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले दिलीप वळसे सध्या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत.
- मविआ मंत्रिमंडळात उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असलेल्या वळसे यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.