मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. फार्मा कंपनी सिप्ला आणि रोश इंडियाने एकत्रितपणे अँटीबॉडी कॉकटेलची निर्मिती केली आहे. हे औषध आता भारतीयांसाठी उपलब्ध झालं आहे.
काही दिवसांपूर्वी आपत्कालीन वापरासाठी मिळाली मंजुरी अँटीबॉडी कॉकटेल कैसिरिविमैब (Casirivimab) आणि इम्डेविमैब (Imdevimab) यापासून बनवलं गेलं आहे. या औषधाचा पुरवठा सिप्ला कंपनीमार्फत केला जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला याला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.
Roche & Cipla announce the arrival of the first batch of the new antibody cocktail drug (#Casirivimab and #Imdevimab) in India – aimed at reducing the risk of hospitalization and helping in early recovery in #Covid19 patients by halting progression. https://t.co/CynBXp6hbO pic.twitter.com/xtLl26RHKw
— Cipla (@Cipla_Global) May 24, 2021
अँटीबॉडी कॉकटेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?
एका रुग्णाच्या डोससाठी ५९ हजार ७५० रुपये मोजावे लागतील. हा डोस १२०० मिलीग्रॅमचा आहे. ज्यात ६०० मिलीग्रॅम कैसिरिविमैब आणि ६०० मिलीग्रॅम इम्डेविमैबचा समावेश आहे. या औषधाच्या एकापेक्षा अधिक डोसची किरकोळ किंमत १ लाख १९ हजार ५०० रुपये इतकी आहे. या डोसच्या एका पॅकमध्ये २ रुग्णांवर उपचार होऊ शकतात, अशी माहिती कंपनीने दिली आहे. मुख्य रुग्णालयं आणि कोरोना सेंटरमधून हे औषध रुग्णांना मिळू शकेल. हे अँटीबॉडी कॉकटेल १२ पेक्षा अधिक वय तसं ज्यांचं वजन किमान ४० किलोग्रॅम असेल अशा रुग्णांनाच दिलं जाईल. मानवी शरिराला विषाणुची बाधा होऊ नये, यासाठी याची निर्मिती केल्याचं सिप्ला कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.