मुक्तपीठ टीम
उन्हाळ्यात अन्नाबरोबर दही खाल्ल्याने केवळ अन्न पचत नाही तर, शरीरातील उष्णतेलाही थंडावा मिळतो. दररोज एक वाटी दही खाल्ल्याने बॉडी डिटॉक्स होते, परंतु अशा पाच गोष्टी ज्या दही बरोबर खाऊ नयेत. या गोष्टी दहीबरोबर खाल्ल्याने शरीरात विष तयार होतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
१. आंबा आणि दही
आंबा आणि दही एकत्र खाऊ नये, हे दोन्ही ही शरीरासाठी बाधक आणि विष ठरतात, कारण त्यांचा प्रभाव एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा असतो.
२. उडीद डाळ
उडदाची डाळ दही बरोबर खाऊ नये, दोन्ही एकत्र येऊन पोटाला हानीकारक ठरतात. शरीरावर याचा मोठा परिणाम होतो.
३. दूध आणि कांदा
दूध आणि कांदा दोन्ही एकत्र खाऊ नयेत. असे केल्याने आम्लपित्त, गॅस आणि उलट्यांचा त्रास होतो. डायझेशनची समस्या देखील असू शकते.
४. मासे आणि दही
मासे देखील दही बरोबर खाऊ नयेत. याचा शरीरावर वाईट परिणाम होतो, तसेच अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
५. तळलेल्या गोष्टी
सामान्यत: कुटुंबात असे दिसून येते की, पराठेसह दही मोठ्या आवडीने खाल्ले जाते, परंतु याचे सेवन करू नये. यामुळे अपचन होते.