मुक्तपीठ टीम
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. दरम्यान, आता या प्लॅटफॉर्मवर महिलांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. यासंबंधित नेटफ्लिक्सने नॅशनल फ्लिम डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी एक करार केला आहे. या करारा अंतर्गत देशातील १०० महिलांना चित्रपट लेखन आणि फिक्शन लेखनाच्या तंत्राचे धडे दिले जाणार आहेत. यासंबंधित नेटफ्लिक्स इंडियाच्या कन्टेंट हेड मोनिका शेरगिल म्हणाल्या की, “कंपनी सध्या १८ महिला चित्रपट दिग्दर्शकांसमवेत कार्यरत आहे. आम्हाला चित्रपट क्षेत्रात महिलांची उपस्थिती अधिक वाढवायची आहे”.
नव्या महिला चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपट हस्तकला यासर्व विभागांमध्ये महिलांची उपस्थिती वाढविण्यास कंपनीकडून सांगण्यात आले आहे. येत्या काळात बॉम्बे बेगम, पगलेट आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटांची सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहेत, जे महिला लेखकांनी लिहिलेल्या कथा आहेत.
नेटफ्लिक्स महिलांच्या गुणांना वाव देण्यासाठी जगभरात ५० लाख डॉलर खर्च करणार आहे. हा खर्च फक्त नेटफ्लिक्ससाठीच्या चित्रपटांवर काम करणाऱ्या मेकर्स, निर्माते आणि लेखकांवर खर्च होणार नाही, तर कोणताही चित्रपट जो इंडस्ट्रीसाठी काम करत असेल त्याचा या खर्चात समावेश असू शकतो.