मुक्तपीठ टीम
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी घएण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) परीक्षेची तारीख या आठवड्यात जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोरोना माहामारीमुळे ज्या विद्यार्थांना गेल्यावर्षी परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थांना यावर्षी परीक्षा देण्यासाठी सेकेंड अटेम्प्ट आयोजित केली जावी या मागणीवरही अंतिम निर्णय या आठवड्यात होणार असल्याचीही शक्यता आहे.
एमबीबीएस आणि बीडीएस मधील पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (यूजी) परीक्षा २०२१ विषयी राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे (एनटीए) महासंचालक विनीत जोशी यांनी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात नीट परीक्षांची घोषणा होईल असे सांगितले आहे.
नीट २०२१च्या परीक्षेची घोषणा करण्यास होणाऱ्या दिरंगाईबाबत एनटीए डीजीने माहिती दिली की, देशभरात एकूण २८ मंडळे आणि दोन मंत्रालये आहेत, त्यामुळे सर्व मंडळातील सदस्यांची सहमती मिळण्यास वेळ लागत आहे. “ते सर्व सदस्यांशी सल्लामसलत करीत असून विद्यार्थ्यांच्या हिताचे सर्व पैलू पाहत आहोत. आशा आहे की ते फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतील”. यापूर्वी महासंचालकांनी अशी माहिती दिली होती की, ते शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधत आहे आणि लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येतील”.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी नुकतीच माहिती दिली होती की,”दोन वेळा नीट परीक्षा घेण्याच्या सर्व शक्यतांवर मंत्रालयाकडून विचार केला जात आहे”. त्याचबरोबर राष्ट्रीय परीक्षा मंडळानेही मंत्रालयाला पत्र लिहून दोन वेळा परीक्षा घेण्यासंबंधित स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे कमी वेळेत परीक्षेची तयारी करण्याचा विद्यार्थ्यांवरील दबाव कमी होईल, असे मंडळाने म्हटले आहे.