मुक्तपीठ टीम
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-२०२१ परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा १ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. यासंबंधित माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in यावर जाहीर केली आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. तसेच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयात एमबीबीएस/बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.
एमबीबीएस/बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ntaneet.nic.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच मराठी, इंग्रजी, हिंदीसह ११ वेगवेगळ्या भाषेत नीटची परीक्षा घेण्यात येणार आहे.
नोंदणी कशी करायची?
- नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा.
- यानंतर उमेदवारांनी प्रथम होम पेजवर जाणे आवश्यक आहे.
- यानंतर नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा.
- यानंतर अधिसूचनेमधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा.
- यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड निवडा आणि सबमिट करा.
- यूजरनेम / मोबाइल क्रमांक, पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- अॅप्लिकेशन फॉर्म डिस्प्ले स्क्रीनवर दिसेल.
- यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सर्व सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा.
- नोंदणी शुल्क भरा.
- तसेच दस्तऐवजांचे प्रिंटआउट घ्या.