मुक्तपीठ टीम
टोकियो ऑलिम्पिकमधील आजचा दिवस भारतीयांसाठी सुवर्णोत्सवी असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण भारताच्या पदकांच्या यादीत पहिल्या सुवर्ण पदकाची नोंद झाली आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. नीरजने ८७.८८ मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. नीरजच्या या सुवर्ण कामगिरीनंतर ट्विटरवर चर्चा सुरु झाली ती १५ नोव्हेंबर २०१७ म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी त्याने केलेल्या एका ट्वीटची.
चार वर्षांपूर्वीचा ट्वीट संकल्प, आज प्रत्यक्षात!
- “जब सफलता की ख्वाहीश आपको सोने ना दे, जब मेहनत के अलावा और कुछ अच्छा ना लगे, जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो, समझ लेना सफलता का नया इतिहास रचनेवाला है!”
- हे ट्वीट केले होते नीरज चोप्राने. १५ नोव्हेंबर २०१७ म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी!
- त्या संकल्पाप्रमाणेच तो अथक, सतत, अविरत परिश्रम करत राहिला आणि आज त्याने जे सांगितलं ते करून दाखवलं…भारतासाठी सुवर्ण पदक मिळवलं!
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) November 15, 2017
नीरजची सुवर्ण कामगिरी
- नीरजने पहिल्या थ्रोमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत आघाडी मिळवली होती.
- तर दुसऱ्या थ्रो ८७.५८ मीटर लांब भाला फेक करत आपले पहिले स्थान कायम ठेवले.
- तिसऱ्या थ्रो त्यांनी ७६.७९ मीटर लांब केला.
- चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरले.
- त्यानंतर सहाव्या थ्रोमध्ये नीरजने ८४ मीटर भाला फेकला.
- हा थ्रो निर्णायक ठरत नीरजने देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली.
पानिपतचा वीर, जे ठरवलं तेच केलं!
- खेळाडू नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात राहणारा आहे.
- नीरजचा जन्म एका शेतकरी कुटुंबात २४ डिसेंबला झाला.
- भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती.
- सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा क्रिकेट खेळत होता.
- मात्र, त्यानंतर भालाफेक खेळामध्ये अथक प्रयत्नाने नीरजने गुणवत्ता प्राप्त केली.
- नीरज चोप्रानं मार्च २०२१ मध्ये पटियालाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये ८८.०७ मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता.
- २०१८च्या आशियाई खेळांमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी नीरजने ८८.०६ मीटर भाला फेकला होता.
- तर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
६ कोटींचं बक्षीस!
- नीरज चोप्रा भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात यशस्वी ठरला.
- त्याच्या या यशाला लक्षात घेत हरिणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले.
- यासोबतच हरियाणा सरकारच्या वतीने त्याला ६ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
- तसेच नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ अशी हरियाणा सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.