Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाटण्यातील मंदिराचा गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन प्रसाद

May 3, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Patna temple

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या या कठीण काळात अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहात. बिहारची राजधानी पाटनामधील प्रसिद्ध महावीर मंदिराकडून पुरवला जात असलेला ऑक्सिजनचा प्रसाद सर्वत्र चर्चेत आला आहे. या मंदिराच्यावतीने कोरोनातील गंभीर रूग्णांसाठी मोफत ऑक्सिजन वितरण सुरू करण्यात आले आहे. गरजूंसाठी हे ऑक्सिजन प्राण वाचवणारा मोलाचा प्रसाद ठरत आहे.

 

महावीर मंदिराच्या अधिकृत mahavirmandirpatna.org संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू आहे. बुकिंगनंतर दिलेली स्लिप आणि ऑक्सिजनची पातळी कमी असल्याची वैद्यकीय स्लिपसह रुग्णाच्या आधार कार्डची छायाचित्र सादर केल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर पुन्हा भरला जातो. आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, “महावीर मंदिराच्या वतीने मानवतेची सेवा करण्याचे हे कार्य पूर्णपणे विनामूल्य आहे. महावीर मंदिर ट्रस्टने ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्यासाठी संपूर्ण देशात संपर्क साधला, पण चार महिन्यांपूर्वी कुणीही याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले नाही. म्हणून स्थानिक पातळीवर स्वस्त पद्धतीने ऑक्सिजनचे वितरण करून ते मोफत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

 

दररोज दीडशे गरजू रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे लक्ष्य आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असेल तेव्हा हे वाढवता येऊ शकते. ते म्हणाले की, “महावीर मंदिराचा हा प्रयत्न म्हणजे कोरोनाबरोबरच्या युद्धामध्ये रामजींच्या पुलावरील खारू ताईच्या भूमिकेसारखी सेवा असेल. एक लहान सिलिंडर खरेदी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले परंतु कुठेतरी उपलब्ध नसल्याने सिलिंडरचे व्यवस्थापन करता आले नाही. म्हणूनच, केवळ रूग्णाच्या वतीने १० लिटर पर्यंतचे मोकळे छोटे सिलेंडर लावून ऑक्सिजन दिले जात आहे.”

 

ऑक्सिजन पुरवठ्यात सहकार्याबद्दल महावीर मंदिर ट्रस्ट सचिव संजय भारतीया यांचे विशेष आभार व्यक्त केले. महावीर मंदिराच्या बाहेर जाणाऱ्या गेटजवळ सुरू झालेल्या ऑक्सिजन वितरणाच्या कामाचा ताबा नवीन नैवेद्य शाखेचे प्रमुख रामचंद्रन शेषाद्री यांना देण्यात आला आहे. संजय सरकार, राजू कुमार, संतोष कुमार, विश्वजित, चंदन इत्यादी मोफत ऑक्सिजन रिफिलिंगच्या या सेवा कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत.

 

ऑक्सिजन बुकिंग व वितरणची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेः

१. ऑक्सिजन सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य आहे.
२. ऑनलाईन ऑक्सिजन बुकिंगनंतर तुम्ही तुमचे बुकिंग स्टेटस तपासू शकता.
३. हे ऑक्सिजन विनामूल्य दिले जाईल. यासाठी एक पैसाही घेतला जाणार नाही.
४. रुग्णांनी आधार कार्ड, ऑक्सिजन बुकिंग आयडी स्लिप असलेली मेडिकल स्लिप आणणे बंधनकारक आहे.
५. ऑक्सिजन भरण्यास सुमारे ४५ मिनिटे लागू शकतात, म्हणून आपली बुकिंगची स्टेटस तपासा.
६. सकाळी १०.३० वाजता पहिली डिलिव्हरी. जेव्हा गॅस सिलिंडर पुरेसा प्रमाणात मिळेल तेव्हाच वितरण होईल.

 

पाहा व्हिडीओ :

 

 


Tags: free oxygenPatna templeपाटनामहावीर मंदिर ट्रस्ट
Previous Post

क्रिकेटर, सेलिब्रिटी सारेच सरसावले, चला कोरोनाशी लढूया!

Next Post

कोरोना रुग्णांना मानसिक उभारी देण्यासाठी म्युझिकल प्रयत्न

Next Post
Musical night

कोरोना रुग्णांना मानसिक उभारी देण्यासाठी म्युझिकल प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!