मुक्तपीठ टीम
निरोगी आरोग्यासाठी योग्य पोषक आहार गरजेचा असून त्यामध्ये ऋतुमानानुसार बदल करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी शरीराला आवश्यक असलेले प्रथिनेयुक्त पोषक आहार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयुर पंचकर्म चिकित्सालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी पार्टे यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय पोषण माह निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे, क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभाग आणि महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यातर्फे करवीर तालुक्यातील ज्योतिबा रोडवरील केर्ली ग्रामपंचयात येथील श्री ज्योतिर्लिंग सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मंचावर केर्ली ग्रामपंचायतच्या सरपंच विजयामाला चौगुले, उपसरपंच सचिन चौगुले, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे सहायक संचालक भारत देवमणी, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. प्रसार ठाकूर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक फारूख बागवान, केर्ली ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन खडके, ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, हनुमान विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष सरदार चौगुले, केर्ली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरूण भोसले, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या पर्यवेक्षिका स्वप्निला गुरव, अभिजित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आजारावर मात करण्यासाठी शरीराला आहाराची गरज आहे, असे सांगून डॉ. पार्टे पुढे म्हणाल्या की, केवळ साधा आहार घेऊन चालणार नाही, तर प्रथिनेयुक्त उत्तम आहार घेणे गरजेचे आहे. दररोजच्या जेवनात आपण संपुर्ण आहार घेणे गरजेचे आहे. विशेषतः गरोदर माता, महिला व बालकांनी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. जेवनात अतिशय उष्ण आणि अतिशय शीत आहार घेऊ नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
डॉ. प्रसाद ठाकूर म्हणाले की, कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यातून बाहेर येण्यासाठी आरोग्य साक्षरतेची आवश्यकता आहे. त्याकरीता जनजागृती होणे आवश्यक आहे. ही जनजागृती करणे केवळ सरकारचीच जबाबदारी नसून नागरीकांनीही त्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. बाळ जन्माला येण्यापासून ते २ वर्षापर्यंत गर्भवती माता व बालकांना सकस आहार देणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सुनील सोनटक्के म्हणाले की, माणसाच्या शरीराला पोषक आहाराची जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आवश्यकता असते. कोरोना सारख्या परिस्थितीचा मुकाबला केवळ सृदृढ आरोग्यामुळे आपण करू शकलो आहोत. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य विषयक जनजागृतीचे कार्यक्रम वर्षभर राबविणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रबोधन शाहिरी कलापथकाचे शाहीर हिंदुराव लोंढे व त्यांच्या चमुने शाहिरी पोवाडा सादर करून पोषण आहाराविषयी जनजागृती केली. यावेळी केर्ली माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी व अंगणवाडी सेविकांनी पोषण आहारा जनजागृती रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी रांगोळी, चित्रकला व पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन केर्ली ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी अश्विनी पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अरूण भोसले यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
रांगोळी
- प्रथम बक्षिस – तेजस्विनी कांबळे
- द्वितीय बक्षिस – सोनल पाटील
- तृतीय बक्षिस – सृष्टी चौगुले
चित्रकला स्पर्धा
- प्रथम बक्षिस – प्रगती जाधव
- द्वितीय बक्षिस – प्रियंका चोपदारप
- तृतीय बक्षिस – प्रतिक्षा फारणे
पाककृती स्पर्धा (अगणवाडी सेविका)
- प्रथम बक्षिस – सुनिता पाटील
- द्वितीय बक्षिस – विमल कांबळे
- तृतीय बक्षिस – मंगल पाटील
पाककृती स्पर्धा
- प्रथम बक्षिस – अश्विनी पाटील
- द्वितीय बक्षिस – प्रिया भोसले
- तृतीय बक्षिस – मेघा कांबळे