मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवींच्या नेतृत्वाखालील टीमने मुंबईतील साकीनाका भागातील घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी राज्य सरकारवर टीकेच्या फैरी झाडल्या, “राज्य सरकार आघाडीच्या राजकारणात अडकले आहे. त्यामुळेच राज्यात दोन वर्षे होत आली तरी महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही!” पोलीस आयुक्तांच्या विधानाचा दाखला देत चंद्रमुखी देवींनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली.
राष्ट्रीय महिला आयोगाचा आघाडी सरकारवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या स्थापनेत एवढा उशीर का होत आहे?
- महिला आयोग आवश्यक असूनही का स्थापन केलं जात नाही हे कळत नाही.
- हा महिलांशी संबंधित आयोग आहे.
- अतिशय संवेदनशील विषय आहे.
- लवकरात लवकर आयोग स्थापन करायला हवा.
- राज्य सरकार आपल्या आघाडीच्या राजकारणात अडकले आहे.
- त्यामुळेच त्यांना महिला आयोगाच्या स्थापनेत रस नाही.
- या संस्थांचं पुनर्गठन करावं, त्यात सदस्य नियुक्त करावेत यामध्ये सरकारला काडीचा रस नाही.
पोलिसांच्या भूमिकेवर टीकेची झोड
• मुंबईत भररस्त्यात महिलेवर बलात्कार, ही अत्यंत धक्कादायक घटना आहे.
• त्यामुळे आम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही असं पोलीस आयुक्तांचं विधान निंदनीय आहे. पोलीस सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही हे आम्हालाही कळतं.
• पण पोलिसांचा एक धाक असतो, पोलिसांची दहशत असते, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होत असतो, तो निर्माण करायला हवा.
• ते न करता अशी विधान करणं चुकीचं आहे.
• महिलांवर अत्याचार होत आहेत. याचा अर्थ गुन्हेगारांचं मनोबल वाढलं आहे.
• त्यांच्यावर कायद्याचा धाक राहिला नाही. पोलिसांचा काही धाक नाही. त्यामुळेच ते अशी कृत्य करत आहेत.
राज्य महिला आयोग नसल्याने पोलिसांवर अवलंबून!
- राज्य महिला आयोग ही महत्वाची संस्था आहे.
- पण दोन वर्षापासून राज्यात महिला आयोगाची स्थापनाच झालेली नाही.
- राष्ट्रीय महिला आयोगाला कामानिमित्ताने महिला आयोगाशी संपर्क साधावा लागतो.
- पण इथे महिला आयोगच नसल्याने पोलिसांवर अवलंबून राहावं लागतं.
- कोरोना काळात देशातील सर्व राज्यांतील महिला आयोगाशी संपर्क साधला.
- त्या राज्यातील पीडित महिलांना मदत केली.
- पण महाराष्ट्रात आयोगच नसल्याने आम्हाला त्यांचं सहकार्य मिळू शकलं नाही.
सोमवारी राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षांना, केंद्र सरकारला अहवाल देणार
- पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.
- महिलांच्या चारित्र्यावर बोलू नये.
- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.
- अशा घटनांनी महिलांनी घाबरून जाऊ नये.
- दुर्देवाने काही घटना घडल्यास महिलांनी न घाबरता त्याची तक्रार करावी.
- साकीनाका प्रकरणाची माहिती घेतली आहे.
- सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत.