मुक्तपीठ टीम
उत्तर भारतानंतर दक्षिणेतील तेलंगणातही सेनादलांच्या भरतीच्या अग्निपथ या नव्या योजनेविरोधात आगडोंब उसळला आहे. आतापर्यंत या मुद्द्यावर शांत असलेल्या महाराष्ट्रातही अग्निपथविरोधातील संतापाची धग पोहोचत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोमवारी २० जून रोजी राज्यभर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करणार आहे. रविकांत वर्पे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनानंतर नहाराष्ट्रातही हा मुद्दा चर्चेचा बनण्याची शक्यता आहे.
देशाची सुरक्षितता धोक्यात आणण्याचे भाजपाचे पाऊल
- देशभक्तीची खोटी माला घालून देशाची आणि लष्कराची सुरक्षा धोक्यात घालण्याचे काम भाजप करत आहे.
- सामान्य लोक, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरूण देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती होतात आणि देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावतात.
- देशसेवेची ती संधी फक्त सैनिक म्हणून तरुणांना द्यायला हवी.
- त्याला ठेक्याचे स्वरूप देऊन तरुणांचा अपमान करू नका.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अग्निपथविरोधात आंदोलन
- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी अग्निपथविरोधातील आंदोलनाची घोषणा केली.
- संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेच्या विरोधात आंदोलनं करण्यात येणार आहेत.
- लष्करात कंत्राटी पद्धतीने सैनिकांची भरती करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
- या योजनेमुळे लष्कराचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- केंद्र सरकारने ज्या प्रकारे शेतकरी विरोधी कृषी कायदा मागे घेतला. त्याचप्रमाणे, हे पाऊल देखील मागे घ्यावे लागण्याची शक्यता आहे.