मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सांगली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणीला संबोधित करताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसला एक व्यापक रुप आपल्याला द्यायचं आहे. जिल्ह्यातील महिला वर्गाला राष्ट्रवादी विचाराच्या बाजूने वळवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. जिल्ह्यातील प्रत्येक महिला ही राष्ट्रवादीशी जोडली जाईल हा विचार डोक्यात ठेवून काम करा असे ते म्हणाले.
महिला बचत गट हा महत्त्वाचा घटक आहे. या महिलांच्या कामाला बाजार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्या कामाची मार्केटिंग करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. योग्य मार्केटिंग केली तर त्यांच्या कामाला बाजार उपलब्ध होईल. पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अशा कल्पना आणाव्यात तसेच महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव म्हणाले की, ज्यादिवशीपासून माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्यावेळपासून संघटना मजबूत करण्यासाठी मी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत ही कार्यकारिणी तयार झाली. आमच्या संघटनेत सामाजिक कार्यकर्त्या, उच्च शिक्षित अशा प्रत्येक समाज घटकातील लोकांना स्थान दिले आहे. क्रांती एका दिवसात घडत नाही मला खात्री आहे जिल्ह्यातील ही कार्यकारिणी मोठी क्रांती करेल. आज संविधान धोक्यात आहे, केंद्र सरकारामुळे संविधानाच्या मुल्यांची पायमल्ली होत आहे. आपल्याला ही परिस्थिती बदलावी लागेल आणि ही परिस्थिती बदलण्यात आमची कार्यकारिणी सिंहाचा वाटा उचलेल
राष्ट्रवादी महिला काँग्रेस जम्बो कार्यकारिणी
सुस्मिता सुरेश जाधव अध्यक्षा,
उपाध्यक्षा
मृणाल माधव पाटील , मनिषा रघुनाथ पाटील , अनिता विजय पाटील , अनिताताई गणेश कदम , अलका अशोक माने , मिनाक्षी शरणाप्पा अक्की
सरचिटणीस
मंजूषा मधुकर पाटील ,
गीतांजली नागेश इरकर
चिटणीस
रंजना रवींद्र शिंदे , सोनाली विजय भगत , छाया गिरीश शेजाळ , वैशाली विश्वास कदम ,
सहचिटणीस
झिनत रियाज अत्तार , सुजाता अरुण टिंगरे ,रूपाली शेखर भोसले खजिनदार, उज्वला विजय पाटील प्रवक्ती,
सदस्या
भारती सुरेश पाटील , पुनम सूर्यकांत धनवडे , सुनीता आप्पासो तांदळे , अनुराधा सूर्यकांत पद्मन , संध्याराणी रमेश पाटील , प्राची अमोल पाटील , अनुराधा अनिल पवार , नंदा हणमंत शिंदे , शिलाताई मदन पाटील , उल्का दिलीप माने , कमलताई दिनकर पाटील , अश्विनी अर्जुन जाधव , सत्वशिला विलास पाटील , बबुताई महादेव वाघमारे , प्रमिला राजेंद्र पाटील , रोहिणी प्रवीण पाटील , दीपा रविंद्र जाधव , रेखा सुधीर जाधव , शोभा जयसिंग माने , सुनीता गोविंद भिंगारदेवे , रेखा दयाराम सूर्यवंशी , गोकुळाताई विठ्ठल पाटील , रेखा जनार्दन पवार , अश्विनी धनाजी गायकवाड , अनुराधा चंद्रकांत भोसले , माणिकताई अर्जुन माळी , निर्मला विजयकुमार बस्तवडे , जयश्री अजित पाटील , सायली धैर्यशील गोंदील , चारुलता उत्तम पाटील , प्रतिभा धनंजय पाटील , उषा सोपान मोरे , विदुला विजय कावरे , मिनाक्षी संपत पाटील , स्मिता दिनकर महिंद , वंदना श्रीधर यादव , अर्चना महादेव कदम , संजीवनी शंकर कांबळे , नयना भास्कर सोनवणे , श्रद्धा मंगेशकुमार शिंदे , रेश्माक्का मदगोंडा होर्तीकर हसिना फरदीन मुलाणी , छाया बबन मोरे , सविता प्रकाश वाघमारे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्रदेश प्रतिनिधी छाया पाटील, कमल पाटील, युवती जिल्हाध्यक्षा पुजा लाड, रोझा किनीकर आणि सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी स्वागत अनिता पाटील यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव यांनी मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नयना पाटील व मनीषा पाटील यांनी केले.
चौकट
माझ्या वडिलांनी ह्यात भाजपा पक्षात घालवली पण भाजपा मध्ये कोणतीही कामे होत नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मी पक्ष प्रवेश केला.