मुक्तपीठ टीम
भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे राज्यातील सत्ताधारी आघाडीविरोधात आरोपांमागून आरोप करत असतात. ते नेहमीच शेकडो कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप करतात आणि मग आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणांची कारवाईही सुरु होते. आता भाजपाच्या सोमय्यांसारखीच रणनीती वापरणारा नेता राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिकांच्या रुपाने पुढे सरसावला आहे. मलिक गेले काही दिवस एनसीबीविरोधात धक्कादायक गौप्यस्फोट करत आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग प्रकरणात मलिक यांनी केलेले गौप्यस्फोट एनसीबीलाच नाही तर भाजपालाही अडचणीत आणणारे ठरल्याचे मानले जाते.
क्रूझ रेव्ह पार्टीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक गौप्यस्फोटांची मालिका चालवत आहेत. पत्रकार परिषद घेत ते अनेक गौप्यस्फोट करत आहेत. शुक्रवारी त्यांनी क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता. त्याची शुक्रवारी पोलखोल करणार असल्याचे सांगत त्या भाजपा नेत्याच्या मेव्हण्याला एनसीबीने का सोडले?; असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे.
नवाब मलिकांचा सवाल
- नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना,
- एनसीबीला कारवाईमध्ये १० लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी २ लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे.
- जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचं मलिक यांनी केला.
- त्या दोन लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे.
- हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे.
- सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल केला आहे.
शनिवारी करणार आणखी एक गौप्यस्फोट
- मलिक शनिवारी एनसीबीच्या रेडवरून अनेक गौप्यस्फोट करणार असल्याने त्यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
- भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव शनिवारी घोषित करणार.
- एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ८ ते १० लोकांना पकडले आहे असे होते.
- खरे तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारा एक अधिकारी अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो.
- भाजपाचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानेच सगळं गॉसिप केले आहे.
- पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे.
- त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा?
- एनसीबीला याचं उत्तर द्यावंच लागेल.
- काही बाहेरचे हायप्रोफाईल लोकं हे सगळं प्रकरण हँडल करत आहेत.
खरं की खोटं काय हे जनताच ठरवते
- समीर वानखेडेंच्या बाबतीत तक्रार करण्यात अर्थ नाही.
- सर्व पुरावे देवून काही कारवाई होत नाही.
- बेकायदेशीर कामं सुरू आहेत.
- खरं काय आणि खोटं काय हे जनताच ठरवते.