मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.यामुळे मलिकांवर ईडीची कारवाई होणार असे चित्र दिसत आहे. यावर नवाब मलिकांनीही सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे.
नवाब मलिकांच्या ट्वीटनंतर सोमय्या आक्रमक
- किरीट सोमय्यांनी शनिवारी नवाब मलिकांवर आरोप केले.
- ते म्हणाले, मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत.
- हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत.
- त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार.
- मलिक हे आत्ता ट्वीट करतात.
- कारण त्यांना भीती वाटतेय.
- पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे.
- ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे.
- जमिनी ढापल्या आहेत.
- त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे.
- आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार.
- घोटाळा बाहेर आलाय म्हणून मलिक हात पाय मारत आहेत.
- पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही.
- चोरी केली तर शिक्षा होणारच.
नेमकं काय आहे मलिकांचं ट्वीट?
- मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्वीट केले.
- ते म्हणतात, साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.
डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,
गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 10, 2021
मलिकांचे प्रत्युत्तर
- किरीट सोमय्यांच्या आरोपाला नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
- ते म्हणाले, मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे.
- माझ्या घरी धाड पडणार, अशी अनेक दिवसांपासून माहिती आहे.
- जर सोमय्यांना ईडीने प्रवक्ता बनवलं असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं.
- वक्फ बोर्डाच्या कुठल्याच बोर्डावर छापेमारी झालेली नाही.
- फक्त काल एका वक्फ बोर्ड अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं.
- खोट्या बातम्या पसरवून बदनाम करण्याचं काम थांबवा.
- वक्फ बोर्डानं कोणत्या केस रजिस्टर केल्या आहेत, त्याची माहिती द्यावी.